किनवट : तालुक्यातील अंबाडी ( रे.स्टे. ) येथील ज्येष्ठ प्रतिष्ठीत नागरिक गोविंदराव रामजी भवरे (वय 82 वर्षे ) यांचे सोमवारी (ता .26 ) रात्री 9 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मौजे अंबाडी (रे.स्टे.) येथे मंगळवारी (ता.27) दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी शोभाबाई, दोन मुली महामाया मनोहर नगारे (कोल्हारी) व शालिनी सुनिल डोंगरदिवे (औरंगाबाद) , तीन मुलगे , जावई, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.
ते हंबरुजी भवरे यांचे लहान भाऊ, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा संपादक जितेंद्र भवरे, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी रत्नदीप भवरे व रायगड जिल्ह्यातील तळा येथील वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत फिशेरी संशोधक प्रा. डॉ. बुद्धरत्न भवरे यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment