शिक्षकीपेशातून माझ्या हातून किती विद्यार्थी घडले हे पहा ; अन्यथा उर्वरित सेवेत देशहित जपणारे विद्यार्थी घडवा -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, December 28, 2022

शिक्षकीपेशातून माझ्या हातून किती विद्यार्थी घडले हे पहा ; अन्यथा उर्वरित सेवेत देशहित जपणारे विद्यार्थी घडवा -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

 



किनवट : माझ्या शिक्षकीपेशातून माझ्या हातून किती विद्यार्थी घडले यांचा लेखा जोखा तयार करावा आणि नसतील तर शिल्लक राहिलेल्या सेवेतून देशाला विकासाच्या उंचीवर नेणारे विद्यार्थी घडविण्यास आपलं जीवन अर्पावे असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.

       मथुरा लमाण समाजाचा देशातील एकमेव गुरुद्वारा असलेल्या चंद्रपूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत आयोजित संकुल थाराच्या केंद्रिय शिक्षण परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर गुरुद्वाराचे महंत गुलाबसिंग महाराज साबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मानव विकास कार्यक्रमाचे समन्वयक उत्तम कानिंदे, मारेगाव (व) केंद्राचे केंद्र प्रमुख रमेश खुपसे हे उपस्थित होते. याप्रसंगी 'महामानव वाणी प्रबोधन गाणी' गीतसंग्रहाचे गीतकार शंकर सोनकांबळे व माहिती दर्शिका निर्मिती गटाच्या सदस्या राणी नेम्माणीवार यांचा सत्कार करण्यात आला.

       प्रतिमा पुजनानंतर साहेबराव डोंगरे यांनी स्वागत गीत गाईले. प्रास्तविक केंद्र प्रमुख बाळासाहेब कदम यांनी व सूत्रसंचालन दिलीप सोळंके यांनी केले. 

             रेणूका पतपेढीचे चेअरमन सुधाकर दहिफळे, मुख्याध्यापक सुभाष न्यालमवार, शिक्षक गजानन जमादार यांनी मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

          यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम लोखंडे, मनोहर मडावी, माजी उपसरपंच रामराव कातले, मुख्याध्यापक दिलीप इंगळे, किशन डोंगरे, पांडुरंग सातपुते, विनोद पांचाळ, एस.आर. केंद्रे, अरुण डवरे, एस.व्ही. राठोड, त्र्यंबक साबळे, प्रभाकर जमादार, पांडुरंग खरोडे, उत्तम खसावत, व्ही.ए .शेर्लावार, यू. टी. जाधव, डी. एस. येरवाळ , सुलभक बोरकर, सुधाकर भरणे, आर. बी. बैलके यांची प्रमुख उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News