किनवट : उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना शबरीमाता घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी विधानसभेत केली.
किनवट व माहूर तालूके ही आदिवासी व डोंगरी असून येथे आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. गोरगरीब आदिवासी कुटुंबे उघड्यावर वास्तव्य करीत आहेत. परंतू आजपर्यंत अनेकांना शबरी माता योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला नाही. ही बाब लक्षात घेऊन नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत माझ्या किनवट माहूर मतदार संघातील आदिवासी कुटुंबांना शबरीमाता घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे अशी मागणी आमवार भीमराव केराम यांनी केली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या उत्तरात असे सांगितले की, आजपर्यंत 85 हजार लाभार्यांना शबरी माता योजनेतून घरकुल देण्यात आले असून ज्यांनी घरकुलासाठी प्रस्ताव दाखल केला अशा सर्वांना घरकुल देण्यात यावे यासाठी सर्वच आदिवासी प्रकल्प अधिकार्यांना आदेशीत केले आहे.
आमदार भीमराव केराम यांनी शबरीमाता योजनेतून आदिवासी समाजाला घरकुल मिळवुन देण्याची मागणी केली व त्यांच्या मागणीला यशही आले असुन किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील जनतेंनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.




No comments:
Post a Comment