मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन : 2 जानेवारी रोजी बहादरपुरा येथे दुपारी 4.00 वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, January 1, 2023

मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन : 2 जानेवारी रोजी बहादरपुरा येथे दुपारी 4.00 वाजता अंत्यसंस्कार

 





नांदेड (जिमाका) ता. 1 :  शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे वार्धक्यामुळे रविवारी (ता. 01 ) निधन झाले. वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.

         महाराष्ट्राच्या विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील कंधार सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भागाचे त्यांनी प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्त्व केले. डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून आयुष्यभर आग्रही भूमिका घेतली. आपल्या राजकीय कारकीर्दीत संघर्षाची त्यांनी भूमिका घेतली असली तरी व्यक्तिगत पातळीवर सर्वांशी जपलेला स्नेह व स्पष्ट वक्तेपणा अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत जपली.

         त्यांच्या शताब्दीनिमित्त विधिमंडळातर्फे काही महिन्यांपूर्वी भव्य सत्कार करण्यात आला होता.  त्यांच्या योगदानाबद्दल विधिमंडळात मान्यवरांनी केलेल्या गौरवाने ते भारावून गेले होते.

         त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथून  बहादरपुरा येथे आज रात्री दहा पर्यंत पोहोचेल. उद्या सोमवारी (ता . 2 जानेवारी )  बहादरपुरा येथील त्यांच्या शेतातील राहत्या घराजवळ दु. 4.00 वाजता  त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या परिवारातर्फे कळविण्यात आली आहे. 


जाणता राजा


शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धाेंडगे यांच्या नांदेड येथील शिवाजी हायस्कुलात १० व्या इयत्तेत (७४-७५ साली ) मी शिकत असताना समाजवादीपणा शिकता आला पुढल्याच वर्षी माझ्या वडिलांची बदली कंधार ला झाल्याने मी कंधार च्या शिवाजी महाविद्यालयात ११वीत प्रवेश घेतला त्याकाळी आद.केशवराव धाेंडगे शेकापचे आमदार हाेते लाेकप्रतिनिधी त्याकाळी शैक्षणिक कामासाठी  ईबीसी प्रमाणपत्र व तात्पुरते जात प्रमाणपत्र लेटर पॅडवर देत असत मी व माझा एक मित्र कंधार शहराला लागूनच असलेल्या त्यांच्या बहाद्दरपुरा गावात प्रमाणपत्र आणण्यासाठी  गेलाे.त्यांचे घरी गेल्यावर कळलेकी आमदार साहेब मन्याड नदी काठी फिरण्यास गेले आहेत मन्याड नदी गावापासून अर्ध्या कि.मी़वर हाेती आम्ही दाेघेही तेथे पाेहचलाे आमदार व एक व्यक्ति नदी काठावर बसलेले आम्हाला दिसले आम्ही त्यांच्यापासून  अंदाजे ५० मीटरवर उभे हाेताे आमच्या मनात  त्यांचेपर्यत जाण्याचे धैर्य हाेत नव्हते आम्ही त्यांचेकडे पहात १५/२० मिनिटे उभे हाेताे आमदार साहेबांची चाणाक्ष नजर आमच्यावर पडली आमदारांनी स्वता हातवारे इशारा करीत आम्हाला बाेलावले आम्ही गेलाे जयक्रांती असा नमस्कार केला(सर्वच महाविद्यालय विद्यार्थी आपसात जयक्रांती म्हणत जसे आपण जयभीम म्हणताेत.हा जयक्रांतीचा उद् घाेष भाई धाेंडगे यांचा आहे) काय पाहिजे त्यांनी विचारले मी म्हणालाे प्रमाण पत्र पाहिजे आमदारांसाेबत नेहमी हँडबॅग असायची.त्यांनी बॅगेतून लेटरपॅड काढले व नावे विचारली दाेन मिनिटात त्यांनी प्रमाणपत्रे दिली. मी अणेक वर्ष ताे क्षण आठवित हाेताे. की लाेकनेता असा असावा की ताे जाणता राजा असावा माझ्या व्यक्तिमत्व घडणीत कंधार शहराचा (३ वर्ष) माेठा वाटा आहे, म्हणून या लाेकाभिमुख नेत्याप्रती हा लिखाण प्रपंच.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

-रामचंद्र देठे


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News