सावित्रीमाई फुले हा भाषणाचा नव्हे चिंतनाचा विषय -तहसीलदार डॉ. मृणाल जाधव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 4, 2023

सावित्रीमाई फुले हा भाषणाचा नव्हे चिंतनाचा विषय -तहसीलदार डॉ. मृणाल जाधव

 


    

किनवट : 'ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले'  भाषणाचा विषय नसुन चिंतनाचा विषय आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना अभिवादनासाठी मुलगा-मुलगी लिंग भेद न करता समान दर्जा, सारखा पोषण आहार, योग्य जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य , बाल विवाह प्रतिबंध करून जिजाऊ -सावित्रीमाईंचा वारसा आपल्या घरापासून अनुसरावा, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले.

           तक्षशीला बुद्धविहार विद्यानगर गोकुंदा येथे प्रबोधन विचारमंच किनवटच्या वतीने आयोजित प्रबोधन व्याख्यान, डॉक्टर झालेल्या सावित्रीमाईंच्या लेकींचा सत्कार व एकपात्री अभिनय कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना डॉ. जाधव म्हणाल्या प्रबोधन विचार मंचने परिवर्तनाचे विचार पेरण्यासाठी स्तुत उपक्रम आयोजिला आहे. यावेळी प्रमुख अतिथी  भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, स्वागताध्यक्ष सत्यशोधक विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर, व्याख्यात्या सावित्रीमाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके उपस्थित होत्या.

     महानायकांच्या प्रतिमांना पुष्पार्पण केल्यानंतर  मान्यवरांचे शाल, गुलाब पुष्प व नाटककार तामगाडगे गुरुजी लिखित क्रांतिसूर्य नाट्यग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. प्रबोधन विचारमंचचे अध्यक्ष राजा तामगाडगे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी आभार मानले.


        'काळाच्या पुढे धावणारी स्त्री : ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले' या विषयावर विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी करून  प्राचार्या शुभांगीताई ठमके ह्यांनी वातावरण मंत्रमुग्ध केले.

     सावित्रीमाई फुले जयंती बालिका दिनाचे औचित्य साधुन जिद्द व चिकाटीने शिकून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. स्वाती मिलिंद मुनेश्वर, डॉ.शालिनी भुजंगराव शेवाळे, डॉ.प्रतीक्षा प्रमोद स्थूल, डॉ.स्नेहल मनोहर सावळे व  डॉ.स्नेहल विनय वैरागडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी समयोचित विचार मांडले. 

           शिवणकामगार यशोधराची मुलगी ऋतुजा देवतळे हिने घरीच अभ्यास करून उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला म्हणून तिला मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, गोकुंदा यांच्या वतिने अभि. प्रशांत ठमके व प्राचार्या शुंभागीताई ठमके यांनी 25 हजार रुपये भरीव मदत दिली. 

         कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वंदना संभाजी वाघमारे याचा एकपात्री प्रयोग  'होय, मी सावित्री बोलतेय!...'रसिकांचे मनोरंजन तसेच प्रबोधन  करून गेला.     

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबोधन विचारमंचचे सचिव प्रा.अजय पाटील, कार्याध्यक्ष भीमज्योत मुनेश्वर व संयोजन समितीतील प्रा.भीमराव घुले, लक्ष्मण भवरे, कपिलकुमार भवरे, प्रा.डॉ.कपिल पाटील, मुक्तीबोध पाटील, आनंद गिमेकर, विशाल गिमेकर, राहूल तामगाडगे, निवेदक कानिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली. डॉ. आनंदराव ठमके, यादव पाटील, बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे, उपप्राचार्य सुभाष राऊत, प्रा. एस.डी. वाठोरे आदी पाटील व राईज् अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीसह कार्यक्रमासाठी गुलाबी थंडीतही श्रोत्यांची तोबागर्दी  होती हे विशेष.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News