हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्लीची वारी घडवून आणली. या वारीतील वारकर्यांचे मनोगत येथे देत आहोत. - संपादक
वक्तृत्व स्पर्धेने घडवून आणलेली माझी दिल्लीची वारी (भाग १) : कु. महेक कय्युम शेख, दहेली (किनवट)
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्लीची वारी घडवून आणली. या पाच दिवसाच्या दिल्ली वारीत आयुष्यातील सर्वोच्च असा आनंद मिळाला.
परंतु स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोज दिल्लीची स्वप्न पडत होती. त्यामुळे दिल्लीतील पाच दिवसांचा प्रवास वर्णन लिहण्या अगोदर किनवट सारख्या भागात खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिसाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी माझ्या मनाची चलबिचल कशी होती. हे व्यक्त केल्याशिवाय प्रवासवर्णन लिहणे अपूर्ण आहे असे वाटते.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रत्येक विधानसभा मतदार संघात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना दिल्लीचे राष्ट्रपती भवना सोबतच संसद भवन, पंतप्रधान वस्तूसंग्राहलय, लाल किल्ला, इंडिया गेट अभ्यास दौऱ्याची संधी होती आणि ही चालुन आलेली संधी मला सोडायची नव्हती. कारण आयुष्यात अशा पद्धतीची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. त्यामुळे कधी एकदा किनवटला वक्तृत्व स्पर्धा होईल असे वाटत होते.
.. .स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली होती आणि ज्या दिवसाची ज्या क्षणाची वाट बघत होते. तो क्षण तो दिवस एकदाचा ऊजाडला, वक्तृत्व स्पर्धेत एक एक स्पर्धक अगदी प्रामाणिकपणे आपला विषय मांडत होते. माईकवरून माझ्या कोड क्रमांकाची सूचना मिळाली. मोठ्या आत्मविश्वासाने आपला विषय अगदी मोचक्या शब्दात आणि नेमकेपणाने मुद्देसुद मांडणी करुन अगदी प्रामाणिकपणे विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रतिक्षा होती ती निकालाची आणि शेवटी परिक्षकांनी निकालाची यादी वाचायला सुरुवात केली आणि अपेक्षे प्रमाणे मी देखील विजेती ठरले. तेव्हा खऱ्या अर्थाने वाटले “अब दिल्ली दूर नही” स्पर्धेचा निकाल हाती आल्यापासूनच दिल्लीला जाण्याची तयारी सुरु झाली होती. खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन फोन आला. रेल्वेचे तिकिट बुक झाले. शनिवारी (दि.२५) डिसेंबरला नांदेडच्या हुजूरसाहेब रेल्वे स्थानकावरुन सचखंड रेल्वेने सकाळी दिल्लीकडे निघायचे होते. आणि तो क्षण माझ्या जीवनातला अविश्वसनीय आणि अविस्मरणीय क्षण होता. खासदार हेमंतभाऊ पाटील आणि राजश्रीताई पाटील आम्हाला शुभेच्छा अशिर्वाद देण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. आमच्या प्रवासासाठी सुरुवात झाली. दिल्लीत पोहोचल्यानंतर आमच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था वेस्टन कोर्टमध्ये करण्यात आली होती. तिथे फ्रेश झाल्या नंतर आम्ही सर्वजन महाराष्ट्र सदनला पोहचलो. तिथे आयएएस दर्जाचे अधिकारी 'आम्हा सर्वांना विविध विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार होते. त्यांतील “लोकशाही दिल्लीच्या दुर्बीनीतून” दिलेले मार्गदर्शनपर व्याख्यान खरोखरच प्रेरणादाई होते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे होते. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसद भवन यांना भेट देवून आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो कायदे आणि अधिकार यांची खोलवर माहिती घेतली. त्या वास्तु आम्ही नागरीक शास्त्राच्या पुस्तक पाहिल्या होत्या. त्या आम्हाला प्रत्यक्ष पाहायल आणि अनुभवायला मिळाल्या . दिल्लीतील आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर खा. हेमंतभाऊ पाटील आणि पत्रकारांशी थेटसंवाद साधला झाला. नंतर आम्ही प्रधानमंत्री संग्रहालय, राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञानकेंद्र आणि जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर अक्षरधाम येथे भेट दिली आणि या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी आम्हाला भारतीय खाद्यसंस्कृतीची अस्सल मेजवाणी दिली. वेगवेगळ्या राज्यातील जेवणाचा आस्वाद घेतला. या प्रमाणे हा फारच प्रेरणादायी ठरला "दिल्ली दौरा . माझ्यासारखे गल्लीतून दिल्लीत जाण्याचे स्वप्न अनेकजण पाहातात. पण गलिहुन दिल्लीला मी खरोखरच फक्त एका स्पर्धेच्या माध्यमातून आले आणि ते फक्त खा. हेमंतभाऊ पाटील आणि राजश्रीताई पाटील यांच्यामुळे, त्यांनी गुणवंताना सम्मान देवून माझ्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन दिले. त्याबद्दल मी त्यांची आजन्म ऋणी राहील. शेवटी त्यांच्यासाठी एवढेच सांगू इच्छिते, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। घेताघेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.-
कु. महेक कय्युम शेख
रा. दहेली ता किनवट जि.नांदेड वर्ग 11 वी विज्ञान स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा दहेली (तांडा)
No comments:
Post a Comment