प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेवर शब्दांचे शस्त्र घेवुन हल्ला चढविणारा प्रशांत वंजारे यांचा "आम्ही युध्दखोर आहोत" कविता संग्रह -बाबाराव मडावी, आकांतकार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, October 26, 2023

प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेवर शब्दांचे शस्त्र घेवुन हल्ला चढविणारा प्रशांत वंजारे यांचा "आम्ही युध्दखोर आहोत" कविता संग्रह -बाबाराव मडावी, आकांतकार

  


      आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील एक बुलंद नाव प्रशांत वंजारे यांचा काव्यसंग्रह "आम्ही युध्दखोर आहोत " नुकताच प्रकाशित झाला. त्यांनी मला हा काव्यसंग्रह समीक्षा लिहण्यासाठी घरी आणुन भेट दिला. त्यांच्या दिलदार आणि स्नेह जोपासण्याच्या जीव्हाळ्याची आपुलकी वाटली. सम्यकदृष्टीची वाटचाल त्यांचेत निश्चितच आहे. बोधीपर्ण प्रकाशन औरंगाबादने प्रकाशित केलेला हा दिर्घ काव्य संग्रह २२० पेजेसचा असा देखना काव्यसंग्रह आहे. "आम्ही युध्दखोर आहोत" या नावातच युध्दातले हे मैदान आहे. अर्थात हे युध्द डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी छेडलेले युध्द आहे. अजुनही ते सुरुच आहे. वर्णवादी, मनुवादी व्यवस्थेच्या विरोधातले हे मानवी युध्द आहे. या युध्दात असंख्य भीमसैनिक तयार झालेले आहेत. समता आणि मानवता आणण्यासाठी पेटलेले हे रनमैदान आहे. या रणभूमिवरील प्रशांत वंजारे एक सैनिक असुन शब्दांचे शस्त्र घेवुन ते प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेवर हल्ला चढवित आहेत.    

      डाॅ.यशवंत मनोहर सरांची प्रस्तावना या युध्दभूमिचे नेतृत्व करण्यासादठी पुढे आली. डाॅ. मनोहर सर प्रस्तावनेत लिहितात, "आम्ही युध्दखोर आहोत " या कविता संग्रहात वर्तमानात कोसळणारे महाआरिष्ट कवि मांडतोच पण कवि वर्तमानाची झेराॅक्स काॅपी शब्दांच्या हातात देत नाही. तो भेसुर वर्तमानाचे भेदक भाष्य ऊभे करतो. हे पर्यायाचेच सौंदर्य आहे. हे आयुष्याच्या धम्म चक्राचे वा आंबेडकरवादी प्रमाणशास्त्राचेच सौंदर्य आहे. प्रशांत वंजारेची कविता आंबेडकरी विचाराने हल्ला करणारी आहे.  आम्ही या कवितेत प्रशांत यांच्या ओळी

आम्ही फक्त जखमी झालोत

मैदान सोडुन गेलेलो नाही

आम्ही जींकुच शकत नाही या गैरसमजातून

तुम्हीही बाहेर यायला हवं

पिढ्यान पिढ्या छळवाद करणाऱ्या व्यवस्थेने आम्हाला जख्मी करुन ठेवलं आहे. ही जखमच आता अन्यायी व्यवस्थेचा समाचार घेणार आहे. युध्दातले आम्ही जखमी सैनिक असलो तरी तडफणारे आमचे मानवी ईरादे युध्दात घनघोर युध्द केल्या शिवाय राहणार नाही. हा लढा अजुन संपलेला नाही. आमच्या अनेक पिढ्या घायाळ करुन ठेवणाऱ्यावर हल्ला हा अटळ आहे. "आम्ही युध्दखोर आहोत". लढवय्ये आहोत. असे आवाहन कवि प्रशांत वंजारे आपल्या काव्यसंग्रहातुन करतो. आपण हा काव्यसंग्रह अवश्य वाचावा. प्रशांत वजारे यांचे लेखणीस आणि सामाजीक कर्तृत्वास माझ्या हार्दिक शुभेच्छा!

-बाबाराव मडावी,आकांतकार 

९३७३४९१३६३

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News