ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा मोदी व राज्य सरकारवर घणाघात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 3, 2024

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा मोदी व राज्य सरकारवर घणाघात




मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजवादी गणराज्य पार्टीची स्थापना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुंबईत स्थापन केली. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी. एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे त्यांच्याबरोबर सेल्फी व फोटो घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी रांग लावली होती. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे राजकारणात प्रवेश करणार? समाजवादी गणराज्य पार्टीचे नवे नेते कपिल पाटील यांचा सांज दैनिक आपलं महानगर पासून त्यांचा असलेला संबंध व मैत्री पाहता सर्वांचच लक्ष निखिल वागळे यांच्यावर केंद्रीत झाले होते. माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या समवेत मंचावर निखिल वागळे जाताच उपस्थीत प्रेक्षक व पत्रकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही तर पत्रकार म्हणूनच राहणार आहे अशी ग्वाही दिली आणि केंद व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 

        मी इथे माझे जुने मित्र तीन वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या  पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे. गेल्या 40-50 वर्षाचा आमच्या संबंध आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे ते राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितिश कुमार तिकडे गेले. एकदा नाही ' दोनदा नाही, तीनदा गेले. पण कपिल पाटील त्यांच्याबरोबर कधीही केले नाहीत आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे. ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. मी फारसं बोलणार नाही. पण उद्याची लढाई खूप कठीण आहे. ही फॅसीझम विरोधातली लढाई आहे. यासाठी रक्त सांडावे लागेल. कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल हे लक्षात घ्या. म्हणून मला तुम्हाला  या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी सांगायचंय की, आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध म्हणजे वरच्या आणि खालच्या सरकार विरोधात लढायचे आहे.  असं माझं मत आहे. आज जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे. सगळ्यात खोटारडे सरकार आहे. आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुणशी आणि राडेबाज सरकार आहे. लक्षात ठेवा  या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना आगे बढो हम तुम्हारे साथ है! हे चालणार नाही. तू आगे बढो हम तुम्हारे साथ नाही. आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत. हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे. आता घरी बसायची वेळ संपलेली आहे. मी महाराष्ट्रात दौरा करतोय. माझे सहकारी आहेत. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे  सरकार दोन्ही सरकार नको आहेत. त्यांना नकार द्यायचा आहे. पण नकार देण्यासाठी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे? आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत टिकणार आहे. याची मला खात्री आहे. टिकला नाही त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहे तिथे काळजी करू नका. तुम्ही चाले तो पर्यंत हा पक्ष कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील . शेवटचं युद्ध असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या दोन्ही सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. नव्या पक्षाला शुभेच्छा देताना निखिल वागळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News