परभणी : वर्षावासा निमित्त "बुध्द आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे अखंड वाचन करून उपासिकांना भोजनदान देऊन एम.बी.बी.एस.ला प्रविष्ठ दोन सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्याचा वाचिकेच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील अध्यापिका त्रिवेणी पाटील कानिंदै ह्या आपल्या घरी वर्षावासाचे औचीत्य साधुन "बुध्द आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे अखंड वाचन करीत आहेत. त्यांनी यानुषंगाने बुधवारी (ता. 11) सर्व उपासिकांना भोजनदान दिले. तसेच याब वर्षीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमास पात्र झालेल्या खाडे आर्या विशाखा विजय (583 गुण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथ प्रविष्ठ) आणि वाकळे निकीता सवित्ता रणधीर ( 628 गुण घेऊन के.ई.एम. मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रविष्ठ) या दोन्हीही सावित्रींच्या लेकिंचा सहपरिवार अनुष्का रिहॅबिलिटेशन मिशन संस्थेच्या वतीने त्यांनी पुष्प- गुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस मंगल कामना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास सुनंदा सरपे, जयश्री हजारे , विशाखा खाडे, संघमित्रा असालेकर, सविता वाकळे, गियाना कांबळे, शिल्पा कांबळे, सीमा चांदणे, धम्मपाल कांबळे, बौद्धाचार्य अभि.एम. एम भरणे, गुंफाबाई सावंत, उपा. सावंत, उपा. एगंडे आदींसह मानव विहार समितीचे पदाधिकारी बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment