मुंबई : शनिवारी (ता. १४ सप्टे, २०२४ ) सकाळी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
हे वृत्त ऐकुन विधानपरिषदेच्या उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले व विजय वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या दुःखदप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विजय वैद्य यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते अशी होती. त्यांनी मागील पाच दशकाहून अधिक कालावधीमध्ये आपल्या पत्रकारीतेचा ठसा उमटविला आहे. सकाळ, नवाकाळ या दैनिकामध्ये त्यांनी पत्रकारीता केली होती व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवीले होते. तसेच, मुंबई पत्रकार संघाद्वारे प्रदान केला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार देवुन त्यांना गौरविण्यात आले होते.
त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारीतेच्या क्षेत्रात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.




No comments:
Post a Comment