किनवट : दर रविवारी बुद्ध विहारात जावे व बुद्ध धम्म व संघाची प्रेरणा घेऊन दररोजच्या व्यवहारात उपयोग करून, कल्याण व सुखी व्हावे , असे प्रतिपादन पूज्य भन्ते विनयशील , छत्रपती संभाजीनगर यांनी केले .
येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील राजर्षी शाहू नगरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे वर्षावास निमित्त आयोजित धम्मप्रवचन मालिकेत ते धम्मदेशनेत बोलत होते. विहारात वर्षावास निमित्त नगरातील उपासक, उपासिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन व पठण आषाठ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा पर्यंत करित आहेत. दररोज सायंकाळी 8 वाजता त्रिशरण, पंचशील, बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात येवून धम्मपालन गाथा व प्रवचन होतात,
रविवारी (ता. 15 सप्टेंबर 2024 ) भन्ते विनयशील यांनी धम्मदेशना दिली, आना पान सती, ध्यान व अष्टांगीक मार्ग यावर भाष्य करून, उपासिका, उपासक यांनी विहारात येवून विचाराचे आचरण करून सुखी व्हावे व कल्याण साधावे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आनापान सतीचा सराव करून घेतला. प्रा. डॉ. आनंद भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गंगासागर वैरागडे, नंदाताई नगारे, सुनंदाताई पाटील, यांनी केले होते .
याप्रसंगी विपष्यना साधिका चित्राताई नगराळे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमास मित्रविंदा कांबळे, विमलताई लोकरे, मुजमुले दाम्पत्य, नगारे व बाल -बालिका उपस्थित होते. आशीर्वाद गाथा घेऊन भन्तेजींनी कार्यक्रमाची सांगता केली .




No comments:
Post a Comment