तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 8, 2025

तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

 



किनवट, ता८ : तहसील कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (ता.८) राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवाडा साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ.शारदा चोंडेकर या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ऍड.मिलिंद सर्पे व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कराड हे उपस्थित होते.

    प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राठोड यांनी केले.यावेळी बोलताना ऍड.मिलिंद सर्पे यांनी ग्राहक पंधरवड्यानिमित्त ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती  दिली व ग्राहक प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले, तर सुरेश कराड यांनी  समयोचित विचार  व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय गड्डमवाड यांनी केले.

    यावेळी पुरवठा निरीक्षक सतिश सरनाईक, सहाय्यक महसुली अधिकारी एम.डी मुगटकर, पुरवठा निरीक्षक करण गुसिंगे, महसुल सहाय्यक लिंबेश राठोड, विनोद सोनकांबळे यांच्यासह शिवाजी पाटील, सिद्धार्थ मुनेश्वर, मारोती आडे, जनार्धन पाटील,लतीफ भाई,अशोक अंधारे, सुरेश पाटील, केशव पवार, बापूराव राठोड, रामलु तिरनगरवार, काशिराम जाधव, राजु तरटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News