किनवट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी सम्यक मिलिंद सर्पे यांना एम.फिल. ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी दै. सकाळ मधील विकास विषयक बातम्या एक विश्लेषात्मक अभ्यास" या विषयावर लघुशोध प्रबंध सादर केला होता.
सम्यक सर्पे यांचे पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनकर माने, पत्रकार सुरेश पाटील, ऍड.मिलिंद सर्पे, केंद्र प्रमुख तथा स्तंभ लेखक उत्तम कानिंदे, रमेश मूनेश्वर, सुबोध सर्पे, सिद्धार्थ जिगळेकर, ऍड . दिव्या पाटील, शंतनु भवरे आदींनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment