पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा आज मंगळवारी (ता.११ सुरू होत आहे. या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. १८ मार्चपर्यंत परीक्षा असणार आहे. राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत शाळेतील परीक्षा पार पाडण्याचे धोरण परीक्षा मंडळाने घेतले आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी एकूण दहा हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून आठ लाख १० हजार ३४८ विद्यार्थी, सहा लाख ९४ हजार ६५२ विद्यार्थिनी आणि ३७ तृतीयपंथींनी नोंदणी केली आहे. राज्यातील तीन हजार ३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा होईल, अशी माहिती राज्य मंडळाने पत्रकार परिषदेत दिली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असावे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, यासाठी समुपदेशक नियुक्ती आणि हेल्पलाइनही सुरू केली आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या सूचना
वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर १२, १५ आणि १७ मार्चदरम्यान 'आउट ऑफ टर्न'चे आयोजन • बारावीची पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार आणि निकालही जुलैमध्येच जाहीर करणार - राज्य मंडळ स्तरावरील हेल्पलाइन : ०२०-२५७०५२७१ आणि ०२०-२५७०५२७२
राज्यातील नऊ विभागीय मंडळाच्या अंतर्गत या परीक्षा पार पडत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री महोदय श्री. दादा भुसे व पंकज भोयर यांनी परीक्षार्थीना शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment