किनवट: येथील साहित्यिक कवी रामस्वरुप मडावी यांना राज्यस्तरीय 'संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी देवाची आळंदी येथे काव्यनिनाद साहित्य मंच पुणे यांच्या वतीने काव्यनिनाद साहित्य मंच पुणे या परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित राज्यस्तरीय 'संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष- प्रकाश भि. पाठक (छ.संभाजीनगर), उद्घाटक- अनुराधा बेके (मुंबई), प्रमुख अतिथी- विनिता कदम (मुंबई), निता भामरे (नाशिक), समूह संस्थापक अध्यक्ष विकास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक असे होते. तसेच या दिनानिमित भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी झालेल्या राज्यस्तरीय कवि संमेलनात राज्यातील प्रसिद्ध कवी यांनी हजेरी लावली होती. या समूहाचे अध्यक्ष विकास पालवे व संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश भि. पाठक यांच्या हस्ते सर्व सहभागी कवी यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरव करण्यात आला.
कवी रामस्वरुप मडावी यांना 'राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल येथील साहित्यक्षेत्रातील प्रा. डॉ.पंजाब शेरे, उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर, मुख्याध्यापक मोहन जाधव, रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे, सुरेश पाटील, राजेश पाटील, संतोष पहूरकर व मित्र परिवार यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment