किनवट तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरु #दलालांच्या भूलथापांना बळी न पडता अर्ज करावे : अश्विनी ठकरोड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, February 26, 2025

किनवट तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरु #दलालांच्या भूलथापांना बळी न पडता अर्ज करावे : अश्विनी ठकरोड

 


किनवट : तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवट (दक्षिण) व प्रकल्प किनवट (उत्तर) या कार्यालयाचे अंतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी गुरुवारी (ता. 28 फेब्रुवारी 2025 ) पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन किनवट (दक्षिण) व (उत्तर) च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.

         या पदासाठीची किमान शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण. वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असून विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहणार आहे. उमेदवार हा रिक्त पद असलेल्या अंगणवाडी गावचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी ता. 28 फेब्रुवारी 2025 या अंतिम तारखेस कार्यालयीन  वेळेत  एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवट (दक्षिण) व प्रकल्प किनवट (उत्तर) या कार्यालयात विहीत नमुन्यात अर्ज करावेत.

     प्रकल्प किनवट (दक्षिण)अंतर्गत : रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचे नाव : मलकजाम तांडा , अमलापूर , आंदबोरी तांडा मिनी , अप्पारावपेठ क्र.1 , दुर्गानगर मिनी , गोंडेमहागाव मिनी , मार्लागुंड क्र.2 , मार्लागुंडा मिनी , व्यंकटपूर मिनी , बोधडी बु. क्र.2 , चिंचोली मिनी , सिंदगी , सिंदगी तांडा मिनी , बोधडी बु. क्र.11 , चिखली बु. क्र.1 , दहेगाव , पोतरेड्डी , प्रधान सांगवी , आंदबोरी तांडा मिनी , चिखली तांडा मिनी , दहेगाव मिनी , गोकुळनगर मिनी , हिप्पागुडा मिनी, मरकागुडा , खैरगुडा मिनी , नंदगाव तांडा 01, परोटी तांडा 01, परोटी क्र. 01, सांगवी , इस्लापूर क्र. 09, भुजंगनगर मिनी , इरेगाव , सहस्रकुंड मिनी , रोडा नाईक तांडा , करंजी , आनंदनगर , नखातेवाडी मिनी , तळ्याचीवाडी मिनी , वाळकी खु., सावरीक्र.1, सावरी मिनी , दिग्रसतांडा  मिनी , सिंगारवाडी मिनी , उमरवाडी मिनी , रिठातांडा क्र.1, माळकोल्हारी , भंडारवाडी मिनी , धानोरा तांडा क्र.2 , कोपरा क्र. 2 , नागशवाडी मिनी , पेंदा , सावरगाव मिनी, सावरगाव , वाघदरी , मानसिंग नाईक तांडा मिनी , आलुराम तांडा , दिपलानाईक तांडा मिनी ,दिपलानाईक तांडा क्र.1 , दयाळधानोरा मिनी , गोंडजेवली क्र.2, मानसिंगनाईक तांडा , मानसिंगनाईक तांडा मिनी, रामन्नानाईक तांडा मिनी , शिवणी मिनी , तोटंबा , तल्हारी मिनी ,  सेवादास तांडा मिनी , कुपटी खु. क्र.1 या ठिकाणी (जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे) अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदासाठी आणि

    प्रकल्प किनवट (उत्तर )अंतर्गत : रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचे नाव :झेंडीगुडा ,घोगरवाडी, शिवशक्तीनगर ,गोकुंदा क्र.4, गोकुंदा क्र. 17 ,नागझरी कॅम्प, हाटकरखोरी मिनी ,सोनापूर ,भिमपुर, पितांबरवाडी मिनी

सिंदगी क्र.1 ,निचपूर.क्र.3,निचपूर क्र.5, फुलवाडी मिनी ,वरगुडा मिनी, शिवरामखेडा ,माळबोरगाव तांडा,अंबाडी क्र.2 ,पाथरी ,गौरी तांडा,भामपूर मिनी ,सारखणी मिनी ,देवीनगर मिनी ,चिंचखेड मिनी ,भरकतांडा मिनी, सलाईगुडा मिनी ,घोटी क्र.1, घोटी क्र.2, दत्तनगर , सिरमिटी , खेरडा , वडोली क्र.2 , लोणी क्र. 2 ,गणेशपूर जुने ,रोहिदासतांडा, कमठाला तांडा ,नवाखेडा ,मलकापूर ,सांबरलोळी ,राजगड ,खेडी ,मोहाडा मिनी ,पिंपळशेंडा ,पारडी गाव ,दरसांगवी.क्र.1, दरसांगवी.क्र.2, उत्तमनगर मिनी, बाबानाईक मिनी, रणजिततांडा मिनी ,मथुरा तांडा मिनी , मोहाडा तांडा , पळशी डाग , लालूनाईक तांडा ,टेंभी तांडा , ठाकूरवाडी मिनी ,तलाईगुडा क्र.1 , डोंगरगाव , जरूरतांडा क्र.1, जरूरतांडा क्र.2 ,कनकीतांडा , कोठारी मिनी, जमुनानगर, मिनकी , गणेशपूर, लेंडीगुडा , नागापूर पोड , लिंमगुडा ,जरुरगाव , लक्ष्मीनगर या ठिकाणी जाहिर प्रगरणात दशविल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

        इच्छूक महिला उमेदवारांनी आवश्यक साक्षांकित  कागदपत्रासह, स्वाक्षरीसह व विहीत नमुन्यात परिपूर्ण अर्ज कार्यालयात सादर करावेत. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून यात शासन निर्णयाचे व मा. आयुक्तालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. कोणीही कोणत्याही दलालांच्या अमिषाला /भूलथापांना बळी न पडता आर्थिक व्यवहार करून फसवणूक करून घेऊ नये. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News