शिक्षक कराओके गीत गायन राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार....!!! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, February 27, 2025

शिक्षक कराओके गीत गायन राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार....!!!

  




माहूर (नांदेड) : येथील श्री.आनंद दत्त धाम आश्रमात रविवारी (ता.2 मार्च 2025) शिक्षक कराओके गीत गायन राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा 2025 रंगणार असून महाराष्ट्र राज्यातील सहा विभागातून निवड झालेले प्रत्येकी सात असे एकूण बेचाळीस स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. 

     गतवर्षी संगमनेर येथे हा महाअंतिम सोहळा संपन्न झाला होता. यावेर्षी यजमान पदाचा बहुमान माहूरला मिळाला आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रिडा मंडळ मराठवाडा विभाग यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

         या सुरांच्या मैफिलीत महाअंतिम सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे असतील. तर उद्घाटक म्हणून सद् गुरु साईनाथ महाराज वसमतकर हे असणार आहेत. तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा.सा.क.क्री. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे हे असणार आहेत. 

            यावेळी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी , माहूरचे मुख्याधिकारी विवेक कांदे, नायगावच्या मुख्याधिकारी गंधाली पवार, पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, संगितकार राजू जाधव,संगीततज्ज्ञ भारत कोडापे, महाकवि वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संस्थापक संगीततज्ज्ञ सुरेश पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

             त्याचबरोबर हर्षल साबळे, प्रकाश पारखे, नरेंद्र कनाके, तानाजी आसबे, बाबाराव डोईजड, रमेश मुनेश्वर, बिभीषण पाटील, शेषराव पाटील, सुनिता येवले, ज्योती राणे, विद्या शिर्के, उत्तम कानिंदे, मिलिंद जाधव, रुपेश मुनेश्वर व गणेश लेंगरे या सर्व विभागीय अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे.

             गतवर्षी याच संस्थेमार्फत शिक्षक साहित्य संमेलन  माहूर येथे संपन्न झाले होते. त्याच्या यशानंतर शिक्षक गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा इथे होतो आहे. ही सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एक वेगळी मेजवानीच असेल. तसेच प्रत्येक वेळी शिक्षकांना निश्चित मंच उपलब्ध करून देण्याचा उद्देश सफल होताना हा सोहळा प्रेरणादायक होईल असे गौरवोद्गार आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांनी काढले असून या स्पर्धेस शुभेच्छाही दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News