वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 1, 2025

वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा

 



किनवट : येथील एका परीक्षा केंद्रावर वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दुःखात बुडालेल्या विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा.

       सेवालाल नगर, टाकळी ता.उमरखेड येथील सुरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता 10 वीत शिकत आहे. तो येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवार (ता.21 फेब्रुवारी 2025 ) पासून तो 10 वीची परीक्षा देत आहे. शनिवारी (ता. 1 मार्च ) पहाटे ठीक 5:30 वाजता त्याचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या डोक्यावरचे छत्र हरपले.

         वडीलांचे कलेवर,अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर चढून  परीक्षा द्यायची कशी ? असा तो विचार करू लागला. मनाची विचलता,वडीलांच्या निधनाच्या वेदना,जवळ जवळ सुरज जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र,परंतु अशावेळी त्या ने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले. सरांनी प्रत्यक्ष त्याच्या गावी , घरी जाऊन  सुरजचे सांत्वन करत, परीक्षा देऊन तू तुझ्या बाबांना खरी श्रध्दांजली दे, आणि त्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन, त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात हे पटवुन सांगितले आणि सुरज शेवटी परीक्षा द्यायला तयार झाला.  वडीलांचा अंत्यविधी आटोपुन परीक्षेसाठी सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, किनवट या परीक्षा केंद्रावर येऊन साश्रुनयनाने त्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News