मुंबई : जोगेश्वरी येथील रहिवाशी ऍड. भाई मिर्लेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठामध्ये एम. ए. " कला निष्णात (लोकप्रशासन) " या अभ्यासक्रमाचे अध्ययन करून मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत " प्रथम वर्गात " उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना कला निष्णात ( लोकप्रशासन ) ही पदवी प्रदान करण्यात आली.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडला.
दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे खासदार रविंद्र वायकर यांनी ऍड. भाई मिर्लेकर यांचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि डोक्यावर फर टोपी घालून विशेष सत्कार केला. मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील अभिनंदन केले.
आणि पुढेही Phd डॉक्टरेट पदवी मिळवावी अशी इच्छा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment