नांदेड : सहयोग नगर येथील माता रमाबाई आंबेडकर बुद्ध विहारात झालेल्या सर्व व्यापक बैठकीत २५ मे रोजी महिलांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तिसऱ्या बौद्ध विवाह मेळावा आयोजन समितीच्या अध्यक्षस्थानी सुनिता कानिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
तारीख २५ मे २०२५ रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी मार्ट रोड, नांदेड येथे महिलांच्या वतीने आयोजित तिसऱ्या बौद्ध विवाह मेळाव्याच्या आयोजन समितीची नुकतीच कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. त्या मध्ये अध्यक्षस्थानी सुनिता कानिंदे, कार्याध्यक्ष: पुष्पा भरणे, सचिव: निर्मला नरवाडे, सहसचिव: दिशाताई नांगरे, उपाध्यक्ष : रमाताई पाटील, उपाध्यक्ष : कुसुम धोटे, कोषाध्यक्ष : सुनिता वासाटे, सहकोषाध्यक्ष: वैशाली सोनसळे कार्यकारिणी सदस्य: क्रांती प्रधान, जयाताई सुर्यवंशी,वंदना धनजकर,करुना वीर,सत्वशीला भिसे, सुलोचना धबडगे,कल्पना कांबळे, डॉ.सुजाता कांबळे, रेखाताई कोकरे,भारती बिऱ्हाडे, सुप्रिया रावळे, वंदना कावळे,वैजयंती वाघमारे,लता बनसोडे,सत्वशीला थोरात, मीना लांडगे, मनिषा भालेराव, सुरेखा पतंगे,पंचशीला येरेकर, मंदा पाटील, जयश्री भगत, रेखाताई इंगोले, सुरेखा मवाडे,अनुप्रिया अभंगे , मंगला वाघमारे, स्नेहल भरणे, अर्चना घुले, लता भगत , ताराबाई येरेकर, रेखा नाथभजन,सुनिता कांबळे, सुरेखा भगत, पद्मिनीताई इंगोले, सविता कांबळे सावित्रीबाई कानिंदे, शैलजाताई लोणे, अनामिका गच्चे, बबीता पोटफोडे,सागर मल्हारे,पुष्पा उबारे.
सल्लागार: डाॅ.करूणा जमदाडे, मनोरमाबाई कावळे, अनिता हिंगोले, विमलताई किर्तने, प्रा.कविता सोनकांबळे,जनाबाई पोपलवार, प्रतिमा भगत, अंजली मुनेश्वर,वनिता उमरे, पद्मिनीताई इंगोले.
प्रसिद्धी प्रमुख: गुणवंत भगत, सदाशिव गच्चे, भैय्यासाहेब गोडबोले, राजवर्धन भोसीकर.
याप्रसंगी अभियंता भरतकुमार कानिंदे, इंजि. भिमराव धनजकर, टी.पी.वाघमारे, सा.ना.भालेराव, प्रा.प्रल्हाद इंगोले, रमेश कोकरे, राजेश बिराडे, विजय रावळे, रतन येडके, विजय पोपलवार, प्रभाकर वासाटे हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment