किनवट : भोकरच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठुरावा करून माहूर तालुक्यातील सिंदखेड शिवारातील चंद्राप्पा कोटेवार यांच्या शेतातील १०० के.व्ही. रोहित्र तात्काळ उपलब्ध करून दिल्याने मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य), तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी रखखत्या उन्हात होरपळणाऱ्या पिकांना जीवनदान दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. "वसंतात हेमंतांनी शेतशिवार फुलविले " अशा प्रतिक्रिया ग्रामीण अतिदुर्गम भागातील शेवकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
माहूर तालुक्यातील सिंदखेड शिवारातील चंद्राप्पा कोटेवार यांच्या शेतातील १०० के.व्ही. रोहित्र जळाल्याने भर उन्हाळ्यात पिकाला पाणी द्यावे कसे या विवंचनेत परिसरातील शेतकरी होते. अनेकांना सांगून कोणीही दखल घेईना अथवा दाद देईना. ही हवालदिल स्थिती पाहून या परिसरातील अतुल जाधव या शेतकऱ्यांने आपल्या भागाचे माजी खासदार तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य), तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांचेशी संपर्क साधला. रोहित्र जळाल्याने परिसरातील सर्व शेवकऱ्यांची पिक पाण्याअभावी होरपळून गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला मिळतील. तेव्हा आपण पाठपुरावा करून रोहित्र उपलब्ध करून द्यावे , अशी विनंती केली.
तेव्हा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी भोकर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मं.कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन माहूर तालुक्यातील सिंदखेड शिवारातील चंद्राप्पा कोटेवार यांच्या शेतातील १०० के.व्ही. रोहित्र तात्काळ उपलब्ध करणे बाबत पत्र दिले. त्यात असे नमूद केले की , माहूर तालुक्यातील मौ. सिंदखेड येथील चंद्राप्पा कोटेवार यांच्या शेतातील १०० के.व्ही. रोहित्र नादुरुस्त झाल्यामूळे तेथील शेतक-यांना कृषीपंपाकरिता वीज पुरवठा होत नसल्यामूळे त्यांच्या शेतामधील पिकांचे नुकसान होत आहे. तरी एकंदरीत शेतक-यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता १०० के.व्ही रोहित्र तात्काळ उपलब्ध करुन सहकार्य करावे व उलटटपाली मला अवगत करावे. यानुषंगाने पाठपुरावा केल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत दखल घेऊन शेतात रोहित्र उपलब्ध करून दिल्याने सर्व शेतकऱ्यांनी हेमंत पाटील यांचे व महापारेषणचे कार्यकारी अभियंता यांचे आभार मानले आहेत.
"हेमंतांनी वसंतात आमचा मळा फुलवला"
डी. पी. जळाल्याने आम्ही शेतकरी फार हवालदिल झालो होतो. एवढ्या भर उन्हाळ्यात पाण्या अभावी पिके वाचवायची कशी ? अनेकांना सांगून काही फायदा झाला नाही . परंतु आमची आशा ज्यांच्यावर होती. ते कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांना आम्ही विनंती केली. त्यांनी त्वरीत दखल घेऊन पाठपुरावा केल्याने रोहित्र मिळाले. रखरखत्या उन्हात हेमंतांनी वसंतात आमचा मळा फुलवून आमच्यात नवचैतन आणल्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व शेतकरी मनापासून आभार मानतो.
-अतुल जाधव ,शेतकरी , सिंदखेड
No comments:
Post a Comment