नांदेड : नांदेडच्या उल्हासनगर भागातील रहिवासी आंबेडकरी चळवळीतले प्रसिद्ध गायक, नाट्य कलावंत आणि सामाजिक कार्यकर्ते गंगाधर शिवाजीराव झिंझाडे (वय ५५ वर्षे) यांचे गुरू (ता.१ एप्रिल) सकाळी उल्हासनगर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातू, एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. बहुजन संघर्ष सेना या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. २ मे) सकाळी ९ वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment