नांदेड : सांगवी परिसरातील त्रिरत्ननगर इथल्या ज्येष्ठ नागरिक रंजनाबाई मल्हारराव कांबळे (वय ६१ वर्षे)यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १८ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून सीआयएसएफ मधील हवालदार सुमेध कांबळे यांच्या त्या मातोश्री होत व माजी सैनिक राजेंद्र पाईकराव यांच्या सासू तर पत्रकार विकास कदम यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.




No comments:
Post a Comment