किनवट : येथील हनुमान मंदीरातील वंदेमातरम गणेश मंडळाने पर्यावरणपूरक मूर्ती, यूपीआयद्वारे वर्गणी, डीजे मुक्त मिरवणूक , पारंपरिक वाद्यांचा वापर , एल.ई.डी. व्हिडीओ वॉलद्वारे मॅपिंग करून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्याचा अनोखा उपक्रम व शांततामय विसर्जन याची तालुकाभर चर्चा होत आहे.
शहरातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या वंदेमातरम गणेश मंडळ , हनुमान मंदीर , किनवटचे हे 63 वे वर्षे आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्योत्सवाच्या अनुषंगाने या मंडळाने पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली 3 फूटची पर्यावरणपुरक गणेशमूर्ती मुंबईवरून आणली होती. सन 2023 पासून सातत्याने एकाच समाजाकडून यू.पी.आय. द्वारे हे मंडळ वर्गणी जमा करते. स्थापना ठिकाणी अष्टविनायकाचा आकर्षक देखावा निर्माण केला होता. शेवटच्या दिवशी महाप्रसाद जल्लोषात, विसर्जन मिरवणूक DJ मुक्त करून वैशिष्टेपूर्ण आदिवासी ढेमसा , पारंपरिक वाद्य , ढोल , तासे याचा वापर करून जबाबदारीने काढण्यात आली.
शहरातील सर्वच गणेश मंडळांनी एकापेक्षा एक सरस आकर्षक देखावे सादर केले. परंतु यावर्षीच्या विसर्जन मिरवणूकीचे सगळ्यात मोठे वैशिष्टे या मंडळाने असे सादर केले की , निवेदक कानिंदे यांनी एल.ई. डी. व्हिडिओ वॉलद्वारे आधुनिक पद्धतीने मॅपिंग करून ऑपरेशन सिंदूर , भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज , छत्रपती शिवराय यांची भव्य प्रतिमा , भारतातील विविध धार्मिक स्थळे थ्रीडी बॅकग्राऊंड नेत्रदीपक सादर करून प्रेक्षकांच्या नजरेचे पारणे फेडले.
या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेऊन, सीसीटीव्ही कॅमेरे , मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आणि पर्यावरणपूरक, सामाजिक व सुरक्षित असा आदर्श गणेशोत्सव साजरा केल्याची तालुकाभर चर्चा होत आहे.
No comments:
Post a Comment