मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे) : माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या रूपाने बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राल्या सर्वसामान्य शिक्षकांचे ऐकणारे, वाड्या-वस्त्या-तांडे, अदिवासी शाळांना प्रत्यक्ष भेट देणारे शिक्षणमंत्री मिळाले आहेत.मंत्रीमहोदयानी अगदी काही महिन्यात सातत्यपूर्ण आणि झपाटल्यागत कामाने राज्यातील शिक्षण क्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी आपल्या कार्यातून मधल्या काळात शिक्षण क्षेत्रात आलेली मरगळ दूर सारण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते.
हे लिहिण्याचे निमित्त आहे, मा. शिक्षण मंत्रीमहोदयासोबत याच आठवड्यात झालेला शिक्षणातील काही जाणकार मंडळीचा अनौपचारिक संवाद.हा संवाद तब्बल अडीच तास सुरू होता. या संवादात राज्यभरातून उपस्थित असलेले सोळा प्रतिनिधी आणि स्वतः मंत्रीमहोदय सहभागी होते. शिक्षण क्षेत्रात, शाळा स्तरावर सध्या काय सुरू आहे? सोबतच भविष्यात काय व्हायला हवे? याभोवती ही चर्चा होती. अभ्यासक प्रतिनिधीचे बोलणे झाल्यानंतर मा. मंत्रीमहोदय यांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, अंमलात आणलेली धोरणे,सोबतच बालवयात जिल्हा परिषद शाळेतून त्यांची झालेली जडणघडण. त्याची कथा आपल्या मांडणीतून त्यांनी शेअर केली. त्यांच्या बोलण्यातून व आतापर्यंत केलेल्या कामातून शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बदलणारच हा ठाम आत्मविश्वास अनुभवायला येत होता. विशेष म्हणजे बोलताना त्यांनी वेळोवेळी दिलेल्या शाळा भेटी व तेथील शिक्षकांचे कौतुक ऐकायला मिळत होते.
"शिक्षण आनंददायी, गुणवत्तापूर्ण.. शिक्षण भाकरीचे, राष्ट्रीयत्वाचे..!" हे ब्रीद पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा निर्धार. महाराष्ट्र गीत शाळेत बंधनकारक, प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करणे, सामूहिक कवायत संचलन, आयडॉल शिक्षक बॅक, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी, विद्यार्थी हेल्थ कार्ड, पोषण आहार आदी व अन्य उपक्रमांना त्यांच्या काळात मिळालेली गती. हे त्यांच्या कार्यक्षमतेचे मापन आहे.
शिक्षण क्षेत्राची उभारणी केवळ धोरणे आखण्यात नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आहे. संवादाच्या माध्यमातून सर्व घटकांचे विचार जाणून घेऊन त्याची अंमलबजावणी केली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. मा. मंत्रीमहोदय यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेताच राज्यातील विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, उपक्रमशील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण अभ्यासक, शैक्षणिक विषयांवरील पत्रकार, पालक, विद्यार्थी यांच्या बैठका लावून, अतिशय विनम्रपणे प्रश्न समजून घेतले. निर्णय घेतले, अंमलबजावणीस सुरूवात केली. यामुळेच टप्पा अनुदान, शिक्षक मान्यता, शिक्षक भरती, वेळेत निकाल, प्रवेश प्रक्रिया, शालार्थ आय. डी. प्रकरण असे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. संवादातून निर्माण झालेला विश्वास, निर्णयातील पारदर्शकता आणि अंमलबजावणीतील सातत्य हीच एका सक्षम शिक्षणमंत्र्यांची खरी ओळख आहे. हाच विश्वास शिक्षण क्षेत्रात सार्थ होताना दिसतो आहे.
शालेय शिक्षण मंत्री पदाचा ज्यावेळी त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच त्यांनी पदभार स्वीकारला. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हेही त्यांच्यासोबत होते. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शिक्षण क्षैत्रातील इंतभूत माहिती त्यांनी घेतली. राज्यात निर्माण झालेल्या शैक्षणिक समस्या, नवीन आव्हने, त्रिभाषा सूत्र अशा विविध शैक्षणिक विषयावर मंत्रालयातील पत्रकार कक्षात पहिली पत्रकार परिषद घेतली. व या पत्रकारा परिषदेनंतर शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षण क्षेत्रात पत्रकारिता करणाऱ्या विशेष पत्रकारांची बैठक आपल्या शासकीय जंजिरा या बंगल्यावर घेतली आणि शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीची माहिती त्यांनी करून घेतली पत्रकारांना व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन करण्याची विनंती ही शिक्षण मंत्र्यांनी केली . शिक्षण मंत्रालय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तत्पर राहील याची काळजी शिक्षण मंत्री घेतात. अनेक शिक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे शिक्षण तज्ञ, विविध राजकीय संघटनांचे शिक्षक प्रतिनिधी यांची जंत्री नेहमीच त्यांच्याकडे असते अशावेळी प्रत्येकाला प्रत्येकाचे बोलणे ऐकून म्हणणे ऐकून त्याला न्याय द्यायचा ते प्रयत्न करतात प्रसिद्धी पराडमुख असलेले हे शिक्षण मंत्री भविष्यात शिक्षण क्षेत्राला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा अनेक शिक्षकांनी व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या जाणकारांनी दिली.
No comments:
Post a Comment