किनवट : येथील उप विभागीय कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला , भाप्रसे यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी हर्षोल्हासात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे , पोलिस निरीक्षक देविदास चोपडे , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने , नायब तहसीलदार मोहम्मद रफिक , रामेश्वर मुंडे , निलेश राठोड , आदिवासी सेवक नारायणराव सिडाम , माजी नगराध्यक्ष के. मूर्ती , सामाजिक कार्यकर्ते त्रिभूवनसिंग ठाकूर , शिवराज राघू मामा , डॉ. अशोक चिन्नावार , स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी मुक्ताबाई निवृत्ती सावते आदी मान्यवरांसह माजी सैनिक बळीराम कुडमेथे , तुकाराम माशीदवार , अशोक सिडाम , साहेबराव चव्हाण , श्रीराम भरकाडे , अ. भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक प्रमोद पोहरकर उपस्थित होते.
महानायकांचे प्रतिमा पुजन व ध्वजवंदनानंतर स्वरनिनाद संगीत क्लास गोकुंद्दाच्या संस्थापिका संगीत विशारद आम्रपाली वाठोरे- कांबळे यांनी त्यांचे विद्यार्थी इशिता पत्की (संवादिनी वादनासह) , वेदश्री नरवाडे , स्वराली खिल्लारे , संविधान कांबळे यांनी प्रज्योत कांबळे यांच्या तबला साथीने राष्ट्रगीत , महाराष्ट्र राज्यगीत , मराठवाडा गीत व देशभक्ती गीत सादर केले. याप्रसंगी पोलिस उप निरीक्षक देवानंद पडेवार यांच्या नेतृत्वात पोलीस दलाच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राम बुसमवार यांनी आभार मानले.
तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , पंचायत समिती कार्यालयात सहायक गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव व गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.







No comments:
Post a Comment