पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ किनवट तालुकाध्यक्षपदी दिलीप मुनेश्वर, उपाध्यक्षपदी गणेश शेवाळे, सचिवपदी शाहीर दिलीप कोसले व कोषाध्यक्षपदी बालाजी वाढवे यांची एकमताने निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 23, 2025

पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ किनवट तालुकाध्यक्षपदी दिलीप मुनेश्वर, उपाध्यक्षपदी गणेश शेवाळे, सचिवपदी शाहीर दिलीप कोसले व कोषाध्यक्षपदी बालाजी वाढवे यांची एकमताने निवड




किनवट : कलावंताच्या न्याय हक्काकरिता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहिर लोककला संवर्धन मंडळ तालुका शाखा किनवट जिल्हा नांदेड ची कार्यकारणी नुकतीच येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील ज्येष्ठ कलावंत शाहीर केशवराव केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर, मार्गदर्शक शाहीर शंकरदादा गायकवाड , जिल्हाध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे , जिल्हा सहसचिव शाहीर सुभाष गुंडेकर , शाहीर गौतम राऊत पवनेकर , जिल्हा संघटक शाहीर नरेंद्र दोराटे , आदी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक तालुका शाखेची  कार्यकारणी निवडण्यात आली. ती पुढील प्रमाणे :  तालुकाध्यक्ष दिलीप मुनेश्वर ,  उपाध्यक्ष गणेश शेवाळे ,  सचिव शाहीर दिलीप कोसले घोटीकर व कोषाध्यक्ष बालाजी वाढवे. संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे  व मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. 

     याप्रसंगी  कलावंतांच्या  न्याय हक्काच्या अडीअडचणी संदर्भात  चर्चा करून  कलावंतानी एकजुटीने राहणं महत्वाचे आहे  कारण आपलं सघटन मजबूत असल्या शिवाय आपण आपल्या मागण्या शासन दरबारी  मांडू शकतं नाही तेव्हा सर्व कलावंत एकत्र आसणे गरजेचे आहे.  असे याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. त्रिरत्नकुमार  भवरे यांनी कलावंतांच्या ज्वलंत असलेल्या  राजश्री शाहू महाराज साहित्यिक व मान्यवर मानधन निवड समिती जिल्हा नांदेड गठित करण्यात बाबत अनेक वेळा नांदेड जिल्हा परिषद व नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर  कलावंताना न्याय मिळावा म्हणुन अनेक वेळा कलावंताना सोबत घेऊन भंजन आंदोलन केले व आजही ते उपेक्षित असलेल्या कलावंताकरता सदैव प्रयत्नशील असतात गेल्या 23 वर्षापासून ग्रामीण भागातील उपेक्षित असलेल्या पारंपारिक लोक कलावंतांना शाहिरी मेळावे शाहिरी जलसे कला महोत्सव असे कार्यक्रम घेऊन त्रिरत्नकुमार भवरे कलावंतांना स्टेज  उपलब्ध करून देतात आणि कलावंतांचा सन्मानपत्र देऊन गौरव करतात व कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात असे ज्येष्ठशाहीर नरेंद्र दोराटे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी  पारंपारिक शाहीर लोक कला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी  बैठकीस उपस्थित असलेल्या कलावंतांना सखोल असं मार्गदर्शन केले. बैठकीच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ शाहीर केशव केंद्रे  म्हणाले की  पारंपारिक कलावंतांनी आपलं संघटन मजबूत करून आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट असणं आवश्यक आहे तरच आपले प्रश्न सुटतील अन्यथा सुटणार नाहीत  कारण कलावंतांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे आपण सर्व कलावंत जर एकजुटीने राहिलो तर ते प्रश्न आपले नक्की सुटतील अशी अपेक्षा यावेळी केशव केंद्रे यांनी कलावंतांना बोलताना केली.  यावेळी नवनिर्वाचित तालुका सचिव दिलीप कोसले म्हणाले की ऊव॔रित राहीलेली किनवट  तालुका कार्यकारणी लवकरच करून नोव्हेंबर 2025 मध्ये भव्य दिव्य असा लोक पारंपारिक कलावंतांचा शाहिरी मेळावा अनेक दिग्गज कलावंत व मान्यवरांच्या  उपस्थितीत घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

     यावेळी उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांनी मेळावा घेण्याचा निर्धार केला यावेळी बैठकीस किनवट तालुक्यातील कवी गायक अशोक वासाटे , शंकरराव जंगले , संघपाल कांबळे , प्रकाश येरेकर , प्रकाश अंभोरे , सुखदेव कांबळे , संजय ठोके , सोमाजी कांबळे , अनिरुद्ध वानखेडे , सुनील पवार , रामराव शेळके , माधव बोथिंगे ,राजू धावारे , कामराज माडपेल्लीवार ,  हिराजी मुर्तुळे, प्रभाकर सूर्यवंशी , बालाजी येलुतवाड , राजाराम यातेवाड कंमठाला यांच्यासह किनवट तालुक्यातील  कलावंताची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ज्येष्ठ शाहीर भीमराव पाटील यांनी प्रास्ताविक व आभार मानले. नविन कार्यकारणीचे अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यास  शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News