हिमायतनगर (नांदेड) : तालुक्यातील मौजे एकंबा ग्रामपंचीत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात सात ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा देताच जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रापंचायत अधिकारी आर. के. खिल्लारे यांना सेवेतून निलंबित केले असल्याने सामुहिक आत्मदहन माघार घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र हिमायतनगर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , एकंबा येथील यशवंत मारोती वाघमारे, रविकुमार भोजू कानिंदे, श्रीरंग दत्ता सूर्यवंशी, राजू चंद्रकांत देशपांडे, वैभव राम कंदेवाड, रमेश हनमंतराव लुम्दे व गणेश दिगांबर घुगराळे यांनी तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात मागील दिड वर्षापासून दोन वेळा आमरण उपोषण करुन सुध्दा भ्रष्टाचारी ग्रामसेवक , सरपंच, उपसरपंच व रोजगार सेवक हे शासकीय चौकशीअंती दोषी सिध्द होवून सुध्दा यांच्यावर कुठल्याही कार्यवाही होत नसल्यामुळे दि. 29/09/2025 पर्यत दोषीवर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा दि. 30/09/2025 रोजी ग्रामपंचायत एकंबा कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना निवेदनाद्वारे दिला होता.
दिलेल्या पत्रात असे नमूद केले की , मौ. एकंबा ता. हिमायतनगर येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात आपण केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं), जिल्हा परिषद, नांदेड यांना श्री. आर. के. खिल्लारे (ग्राम पंचायत अधिकारी) ग्रामपंचायत कार्यालय एकंबा यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यास्तव प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून सदर प्रकरणात वरिष्ठ कार्यालायकडून नियमानुसार कार्यवाही होईल.तरी सदर प्रकरणात आपण व इतर सहा जने यांनी संदर्भ क्र.3 नुसार ग्रामपंचायत कार्यालय एकंबा समोर दि.30/09/2025 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. तेंव्हा संदर्भ क्र. 5 अन्वये आपणास वरिष्ठ स्तरावरून सदर प्रकरणात नियमानुसार कार्यवाही होईल असे कळविण्यात आले होते. व आत्मदहन माघारी घेणे बाबत विनंती केली होती.
तेंव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांचे संदर्भीय आदेश जाक्र/जिपना/ग्रापंवि/ग्रापं-1/3037/2025 दिनांक 25/09/2025 अन्वये श्री. आर. के. खिल्लारे (ग्रापंचायत अधिकारी) ग्राम पंचायत एकंबा यांना आदेश निर्गमनाच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तरी आपण आपले ग्रामपंचायत कार्यालय एकंबा समोरील सामुहिक आत्मदहन माघार घेवून प्रशासनास सहकार्य करावे. पंचायत समिती हिमायतनगरचे गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
याबाबतचं वृत्त फक्त " निवेदक न्यूज" मध्ये प्रकाशीत झालं होतं. हे विशेष .





No comments:
Post a Comment