भोकर (नांदेड) : तालुक्यातील मौजे रेणापूर या छोट्याशा गावात सध्या प्रचंड खळबळ माजली असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेणापूर ग्रामपंचायतीच्या खात्यातून तब्बल ₹31,81,299 चा अपहार झाल्याचे समोर आले आहे. हा अपहार ग्रामसेवक विकास वामनराव भारती यांनी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.
ग्रामविकासासाठी आलेला निधी जनतेच्या हितासाठी वापरणे अपेक्षित असते, मात्र या प्रकरणात गावच्या विकासाचा गळा घोटण्याचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. अपहाराच्या या धक्कादायक घटनेमुळे डॉ. कैलास कानिंदे व गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
सरपंच लक्ष्मीबाई कानबा गोरेकर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून ग्रामस्थांनी त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. डॉ. कानिंदे व गावकऱ्यांनी एकजूट दाखवत प्रशासनाला इशारा दिला की,"जर रक्कम परत मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू.
गावकऱ्यांचा उद्रेक – एकजूट हीच ताकद
गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत एकत्र येत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. सरपंच लक्ष्मीबाई गोरेकर यांच्यावरही संशयाचे ढग आहेत आणि ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. "न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करू" हा ग्रामस्थांचा इशारा केवळ रागातून नाही, तर एका विश्वासघातातून उसळलेली नैतिक उद्रेकाची भावना आहे. "याच पार्श्वभूमीवर डॉ. कैलास कानिंदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला, ज्यामुळे प्रशासन हादरून गेले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलत ग्रामसेवक भारती यांना निलंबित केले, आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
गावकरी म्हणतात, "प्रत्येक रुपया हा जनतेच्या हिताचा असतो त्यावर डल्ला मारणाऱ्यांना माफ करू शकत नाही.या अपहाराची पूर्ण रक्कम वसूल करावी आणि जबाबदारांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे" ही घटना केवळ एका व्यक्तीचा गैरव्यवहार नसून संपूर्ण ग्रामविकास प्रक्रियेवरील विश्वासाला तडा देणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी सर्वत्र होत आहे प्रश्न अनेक, उत्तरं कुठे? एवढा मोठा अपहार झाला, तो इतके दिवस कुणाच्या लक्षात कसा आला नाही?, लेखा परीक्षण, वित्त विभाग, ग्रामसभेची भूमिका यावर कुठे प्रश्नचिन्ह नाही का? दोषी फक्त एक ग्रामसेवक आहे की यामध्ये संघटीत आर्थिक फसवणुकीचा डाव आहे? यापुढे काय? या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे गावकऱ्यांनी आता गप्प बसायचं ठरवलं नाही "अपहार करणाऱ्यांना शिक्षा आणि निधी गावासाठी परत" हा नारा फक्त घोषवाक्य न राहता, एक जनआंदोलनात रूपांतरित होऊ शकतो प्रशासनाने केवळ निलंबन किंवा तात्पुरती कारवाई करून हात झटकू नये.या घटनेचे उदाहरण म्हणून वापर करून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करावी शेवटचा सवाल:- रेणापूरचा अपहार ही एक घटना नाही, ती एक इशारा आहे.गावांचा निधी गावातच राहावा, त्याचा उपयोग गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, मुलांच्या विकासासाठी व्हावा हीच अपेक्षा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी सखोल चौकशी, फौजदारी कारवाई, आणि लोकनियंत्रणाची यंत्रणा यांची आज अत्यंत गरज आहे.





No comments:
Post a Comment