नांदेड : सहकार क्षेत्राला उतरती कळा येते की , काय असे वाटत असतांना नांदेडच्या सहकारी पतपेढी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले असून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कामधेनू ठरल्याचे गौरवोदगार खा.रविंद्र चव्हाण यांनी काढले.
येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात पतसंस्थेच्या 96 व्या वार्षिक सर्वसाधरण सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, मुंबई मार्केट फेडरेशनचे संचालक बळवंत पाटील बेटमोगरेकर, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास बस्वदे, प्राथमिक शिक्षक संघाचे जीवनराव वडजे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) चे राज्य सल्लागार मधुकर गच्चे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे विठ्ठल बनबरे, बहुजन शिक्षक संघटनेचे डी.एम.हनमंते, तस्लीम शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एम. डब्ल्यू. एच. शेख, सावित्रीबाई फूले राज्यपुरस्कार प्राप्त राजू भद्रे, संगीता कदम यांचेसह गुरुगौरव पुरस्कारप्राप्त शिक्षक, सेवानिवृत सभासद तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेच्या सभासदांना 5.1% प्रमाणे लाभांश वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षिय समारोप करताना आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कार्याचा गौरव करत सहकारी पतपेढीच्या भरभराटीसाठी आपण सदैव शिक्षकांच्या सोबत असल्याची ग्वाही देत सर्व सभासदांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
हजारो शिक्षक सभासदांच्या उपस्थित संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या सत्रात दिर्घ कर्ज मर्यादा सात लाख करणे, विशेष कर्ज आठ लाख करणे, अल्प कर्ज एक लाख करणे तसेच पतसंस्थेच्या रिकाम्या भूखंडावर नवीन इमारत बांधकाम करणे, सभासदांचा विमा उतरवणे आदी ठरावांना आवाजी मताने मान्यता देण्यात आली. सभासदांच्या विविध प्रश्नांना कार्यकारी मंडळाने समाधान कारक उत्तरे दिली.
९६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दत्तराम भोसले, उपाध्यक्ष राजश्री देशमुख -मुळे, संचालिका संगिता माळगे-फसमले , संचालक अशोक पाटील मारतळेकर, बालासाहेब लोणे लहानकर, माणिक कदम, संजय अंबुरे, दिलीप देवकांबळे, जयवंत काळे, अण्णाराव गुमनर यांचे सह अधिक्षक प्रवीण देवापूरे, राजकुमार दयाडे, विनोद मूपडे, बाबासाहेब सोळंके, योगेश पाटील, मारोती ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. उदयकुमार देवकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक हनमंत जोगपेठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





No comments:
Post a Comment