जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे -डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 28, 2025

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे -डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी

 


नांदेड :  जिल्हामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे  पुराच्या पाण्यामुळे अनेक गावात कुटुंब बाधित झाले आहे ; त्यामुळे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जलजन्य  व किटकजन्य आजार उदभवणाऱ् नाही यासाठी जिल्ह्यांमधील गावांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. 

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख  यांनी  रविवारी (ता. 28 सप्टेंबर ) वाजेगाव येथील पूरग्रस्त बाधितांना भेट देऊन चौकशी केली. त्यांचे समुपदेशन व त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली व औषध देण्यात आले.

यावेळी एकुण ६५ रुग्ण  तपासणी केली व गरोदर माता सेवा वंचित बालकांना लस देण्याची सुचना दिली. सर्व रुग्णांची एस.एन. एस .पी मध्ये नोंद घ्यावी असे सांगितले 

पूरग्रस्त बाधितांना स्वच्छ पाणीपुरवठा देणे करिता सरपंच जमील भाई यांना  सुचित केले. मेडिकलोर  ड्रॉप द्वारे पाणी शुद्ध करण्यास सांगितले  पाणी स्तोत्रचे शुध्दीकरण करूनच पाणी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. ताप रुग्ण सर्वेक्षण, मेलीथानची डस्टीग करणे करीता सुचना दिली . 

पूरग्रस्त बाधितांची दररोज आरोग्य तपासणी करण्याबाबत व दररोज औषधी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. नागरीकांनी जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पाणी प्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख यांनी केले आहे. 

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजदुलला, डॉ. पाईकराव राजेश, आरोग्य पर्यवेक्षक कोशल्ये, कुंटुरवार रवी, आरोग्य सेविका शिंदे, गट प्रमुख सिंधुताई पंचलिंगे, बि.सी.एम मुस्ताक भाई सर्व आशा ताई पूणेगाव उपकेंद्र व प्रा . आ .केंद्र वडगाव येथील सर्व कर्मचारी पस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News