किनवट : पारंमपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्यच्या शहराध्यक्षपदी विवेक ओंकार , उपाध्यक्षपदी कामराज माडपेल्लीवार व सचिवपदी अनिल भंडारे यांची नियुक्ती करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
महा, एफ 24444 (नां) या क्रमांकाने नोंदणीकृत असलेल्या पारंपारीक शाहिर लोककला संवर्धन मंडळ , महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यश त्रिरत्नकुमार मा. भवरे, मार्गदर्शक सिने अभिनेता डॉ. प्रमोद अंबाळकर नांदेड, किनवट तालुकाध्यक्ष दिलीप गंगाराम मुनेश्वर , तालुका सचिव शाहिर दिलीप पांडूरंग कोसले , तालुका उपाध्यक्ष गणेश शेवाळे , ता. कोषाध्यक्ष बालाजी वाढवे. नांदेड जिल्हा उपाध्यक्षा किशन परेकार यांनी पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्यची शहर शाखा घोषीत करण्यात आली. ती पुढील प्रमाणे :
शहर अध्यक्ष-विवेक ओंकार , उपाध्यक्ष - कामराज माडपेल्लीवार , सचिव अनिल भंडारे , कोषाध्यक्ष-संजय ठोके , सल्लागार - दत्ता जायभाये , संघटक - संजय जाधव
ही निवड यांची सर्वानुमते करण्यात आली. पारंपारिक शाहीरी लोककला ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मुनेश्वर यांनी सांगितले. शाहिरांचे शब्द व कवी गायकांचे विचार वेळोवेळी तालुक्यात सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी व न्याय हक्कांसाठी आम्ही एकजुटीने पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले. नुतन कार्यकारणी हर्षोल्हासाने काम करेल, अशी ग्वाही सुद्धा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. येणाऱ्या काळात कलावंत पारंपारिक कलेच्या माध्यमातून गाव तिथे शाखा उभारण्यासाठी उत्तम कानिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असेही यावेळी सांगितले. शाहिर दिलीप कोसले यांनी सूत्रसंचालन केले. गणेश शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संखेने कलावंतासह जनसमुदाय उपस्थित होता.




No comments:
Post a Comment