नांदेड : येथील हर्षनगर मधील निवासस्थानी ज्येष्ठ नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत विठोबा वाघमारे (वय ८१ वर्षे) यांचे बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर२०२५) दुपारी ४.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. ६ नोव्हेंबर) दुपारी १.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार असून नांदेडच्या पंचशील हायस्कूलचे मुख्याध्यापक साहेबराव वाघमारे , ज्येष्ठ आंबेडकरी गायक प्रकाश वाघमारे, अशोक वाघमारे, अजय वाघमारे व लताबाई गायकवाड यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment