किनवट : भारतीय राष्ट्रीय अस्मितेचे , अखंड देशभक्तीचे व क्रांतीकारी विचारांचे प्रतीक असलेल्या “वंदे मातरम्” या अमरगीताच्या सार्थ शताब्दी सोहळ्या निमित्त तालुकास्तरीय वंदे मातरम् समूह गायन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम शेकडो विद्यार्थ्यांच्या , अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिना निमित्त गठीत तालुकास्तरीय समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुकासारीय समिती अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर सहायक गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव , कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविण्यता विभागाचे एस.ए. शेळके , ब्राईट एज्युकेशन प्री मेडिकल कॉलेजचे एस. एम. राठोड , पोलीस उप निरिक्षक सागर झाडे , पत्रकार गोकुळ भवरे , स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उद्धव रामतीर्थकर व उल्हास जाधव ह्या समिती सदस्यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संयोजक तथा गट निदेशक नितीन देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रमुख वक्ते प्रोफेसर शाहीर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी या गीताचा प्रेरणादायी इतिहास सांगून जननी माता , गोमाता व धरतीमातेला वंदन करावे व राष्ट्रभक्ती सदैव जागृत ठेवावी असे प्रभावी विचार मांडले.
वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदे मातरम् समूहगीत बहारदार सादर केले. सोनाली वाठोरे , इशिता पत्की यांनी त्यांना साथ केली.
*मातेला वंदन कराय लावणारं हे गीत*
*-तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर*
यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर असे म्हणाल्या की , माते मी तुला वंदन करतो हा वंदे मातरम् चा अर्थ आहे. या भूमीला शक्ती , समृद्धी व देवत्वाचे प्रतीक मानणाऱ्या बंकिमचंद्र चॅटजी यांनी स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्यासाठी हे गीत लिहिले आहे. ते अमरगीत आजही प्रेरणादायी आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनामित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीकांत दुथडे , गणेश पाटील , आर. व्ही. आंबटवार , सायली ठोंबरे , गणेश शिंदे , सागर भटकर , के.यू. मोरे , व्ही.पी. हजारे , एम. जी. पिंपळदरे , डी. एन. मानतुटे , आर. जी. मेसावार , एस. एस. राठोड , एन.एस. देठे , एम. आर. गोफणे , एस. एस. राऊत , ए. एस. माजळकर , जी. आर. खरोडे , यू. आर. जोध , नरेंद्र तरटे , आनंद बलखंडे आदिंनी परिश्रम घेतले.








No comments:
Post a Comment