किनवट : तालुक्यातील इस्लापूर येथील रहिवासी दैनिक गावकरी व दैनिक कुलस्वामी संदेशचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर वैजनाथ पेशवे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
गेल्या 23 वर्षांची परंपरा कायम ठेवत मदत फाउंडेशन सामाजिक संस्थेद्वारे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन श्री गुरुदेव सेवाश्रम गणेश पेठ नागपूर या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष अनिल लाडे व संस्थापक सचिव दिनेश बाबू वाघमारे यांनी केले होते.
राधिका पांडव चारिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीश भाऊ पांडव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विधान परिषद पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी , सोशल वेलफेअर फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँक नागपूरचे अध्यक्ष अनिल नगरी , बार्टीचे तज्ज्ञ मार्गदर्शक साहित्यिक सिद्धार्थ तलवारे , नाळ चित्रपटाच्या सिने अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, स्त्री मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शारदाताई भुयार , मातोश्री भागीरथा शिक्षण संस्था संस्थापक सचिव उमाकांत बागडकर , विजय भाऊ तेलगोटे (अकोट ),मनोज गावंडे , वासुदेव ढोके , मनोज साबळे , ईश्वर मेश्राम , ऍड.अशोक यावले, संजय कडोळे, प्रा. मंदाकिनी जवादे , कवी सुदाम खरे, विजय सरदार , पद्माकर मंडवधरे, या मान्यवरांची पुरस्कार सोहळा प्रसंगी मंचावर उपस्थिती होती.
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील यवतमाळ ,वर्धा , नागपूर ,नांदेड , गडचिरोली , कोल्हापूर ,सोलापूर ,रत्नागिरी , सातारा , पुणे , मुंबई ,संभाजीनगर ,जालना , परभणी ,अहिल्यानगर व बीड या जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या समाज प्रबोधनात, शैक्षणिक, पत्रकारितेत, उत्कृष्ट सहभाग नोंदवून ज्या ज्या व्यक्तींनी समाजासाठी कार्य केले अशा निवडक व्यक्तींचा गेल्या 23 वर्षापासून सातत्याने मदत फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येते.
यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार , डॉ.पंजाबराव देशमुख , विदर्भ स्त्री आदर्श शिक्षक पुरस्कार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्कार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार , महर्षी शाहू महाराज राजर्षी सेवावृत्ती पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज राजशर्षी समाजभूषण पुरस्कार , छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील रहिवासी असलेले दैनिक गावकरीचे तालुका प्रतिनिधी तथा दैनिक कुलस्वामी संदेश चे तालुका प्रतिनिधी परमेश्वर वैजनाथ पेशवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मान चिन्ह , दुपट्टा , प्रशस्तीपत्र ,पुष्पगुच्छ व संविधानाची पुस्तक देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर नांदेड येथील सिद्धार्थ तलवारे यांना सुद्धा छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर साहित्यिक भीमराव तरटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील अभिषेक सौदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील या चौघांची या सन्मानासाठी निवड केली होती.
याप्रसंगी आमदार अभिजीत वंजारी आपल्या भाषणात असे म्हणाले की , विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला पुरस्काराने चालना मिळते व कार्याला उजाळा मिळतो. पुरस्कार रुपी कौतुकाची थाप एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते. त्यांच्यात जीवनात पुढे कार्य करण्यासाठी एक नवीन उमेद निर्माण होते. मदत फाउंडेशन ही संस्था अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील गुणवंत लोकांना व त्यांच्या कर्तृत्वांना नेहमीच उजाळा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप देण्याची कार्य करते. अविरतपणे त्यांच्या हातून हे कार्य घडत राहो.




No comments:
Post a Comment