किनवट : येथील जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदार जागृती गीते, मतदार शपथ व संकल्प पत्र उपक्रम घेण्यात आला. नेहमी कव्वाली, हिंदी गीते सादर होणाऱ्या उर्दू शाळेत मतदार जागृती निमित्त पहिल्यांदाच मराठी भाषेत पोवाडा सादर झाल्याने आगळी- वेगळी अनुभूती घेतल्याचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे व नायब तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने येथील जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने यांनी मतदानाचे कर्तव्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रो.डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाड्यातून मतदानाचे महत्व सांगितले. रुपेश मुनेश्वर यांनी मतदार जागृती गीत सादर करून विद्यार्थ्यांसह सर्वांकडून घोषवाक्य म्हणवून घेतली. रमेश मुनेश्वर यांनी मतदार शपथ घेतली. उत्तम कानिंदे यांनी निवेदनातून लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी आपले हक्क , कर्तव्य व मताच्या अधिकाराचे महत्व विशद केले व प्रत्येकांनी आपल्या आई , वडील पत्र लिहून सर्व कामं- धंदे सोडून मतदान केंद्रावर जावून संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावावा व आपली लोकशाही बळकट करावी असे पत्र लिहिण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका अस्माखातून अब्दुल गफूर , अध्यापक शेख युनूस , इशरत देशमुख , सनाउल्ला खान , शेख इब्राहीम , फसीउल रहेमान , तरन्नुमबेगम , सानियाबेगम , मोहम्मद अतीक , इम्रानखान , मोहम्मद लईक आदींसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.






No comments:
Post a Comment