किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा केंद्रातील मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने जिल्हा क्रीडा संकूल पुणे , बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट या डोंगरी आदिवासी तालुक्यातील गोकुंदा येथील मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी संजय बेंद्रे हिने १७ वर्षे वयोगट व ४० किलोग्रॅम वजनगटाखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत (तृतीय क्रमांक) कांस्यपदक पटकावले आहे. पारंपरिक खेळा व्यतिरिक्त ह्या विद्यार्थिनीने इतर खेळामध्ये कौशल्य प्राप्त करून यश संपादन केले आहे. यामुळे आता ही विद्यार्थीनी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये ५% आरक्षणाची भागिदार झाली आहे.
बारामती येथे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे , एशियन पदक विजेते व कराटे असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव संदीप गाडे यांनी या विद्यार्थिनीस तिला घडविणारे क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप येशीमोड यांचे उपस्थितीत प्राविण्य प्रमाणपत्र व कास्यपदक प्रदान केले.
या भरीव यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके , सचिव प्राचार्या शुभांगीताई ठमके, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास होनधरणे , केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , प्राचार्या स्वाती बनसोड-डवरे आदींसह सर्व शिक्षकांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment