किनवट, ता. 26 : तालुक्यातील घोटी येथील भीमकन्या भावी डॉक्टर समिक्षा सुरेखा सुरेंद्र पाटील हिने परभणीत जिल्हा पातळीवरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गावासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. याबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
घोटी येथील समिक्षा सुरेखा सुरेंद्र पाटील ही परभणीत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने ‘ भारतीय संविधान’ या विषयावर निबंध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत उत्कृष्ट, सखोल आणि अभ्यासपूर्ण निबंध सादर केल्याबद्दल परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते तिला परितोषिक प्रदान करण्यात येऊन तिचा सत्कार करण्यात आला.
निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, समिक्षाने अभ्यासू दृष्टिकोन, संविधानावरील भक्कम आकलन आणि प्रभावी लेखनशैलीच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सत्कार सोहळ्यात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी तिच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशीच निष्ठा व अभ्यास कायम ठेवण्याचे आवाहन केले.
घोटी गावची ही सुपुत्री भावी डॉक्टर बनत असताना शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेला हा यशाचा टप्पा प्रेरणादायी ठरला आहे. गाव, तालुका तसेच शिक्षक-पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




No comments:
Post a Comment