*किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज *मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन निर्भिडपणे आपला मताचा हक्क बजावावा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 1, 2025

*किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज *मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन निर्भिडपणे आपला मताचा हक्क बजावावा - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर

 



किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मंगळवारी (ता.2) होणारी निवडणूक मुक्त आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्याकरिता निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून  मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन निर्भिडपणे आपला मताचा हक्क बजावावा असे आवाहन तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले.
     राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेल्या रूपरेषेनुसार सर्व प्रक्रिया होऊन आता मंगळवारी (ता.2) किनवट नगर परिषेकरिता मतदान घेतले जाणार आहे. किनवट नगर परिषदेत 10 प्रभाग असून याद्वारे 21 सदस्य व नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी 8 व सदस्य पदासाठी 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण मतदार : 25593 असून यापैकी पुरुष मतदार :12334 , स्त्री मतदार :13256 व  ईतर मतदार :03 आहेत. शहरात एकूण मतदान केंद्र : 29 आहेत. यापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. 10 क्षेत्रिय अधिकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत यापैकी 5 राखीव आहेत.
146 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले असून  यापैकी 87 पुरुष व 29 महिला आहेत. तसेच 53 राखीव मतदान अधिकारी असून यापैकी 44 पुरुष व 9 महिला आहेत. निवडणूक प्रक्रियेतील इतर सर्व अधिकारी कर्मचारी  150 पेक्षा अधिकजन कार्यरत आहेत. या प्रक्रियेत 15 वाहनं उपलब्ध केली आहेत
     उप विभागिय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या बंदोबस्तात एक उप विभागीय पोलिस अधिकारी , 2 पोलिस निरीक्षक , 10 पोलिस उप निरिक्षक , 150 पोलिस अंमलदार , 100 होमगार्डस् , आरसीपी 1 प्लाटून , एसआरपीएफ 2 प्लाटून यांचा समावेश आहे.



     निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी आदिंसह अधिकारी-कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कटाक्षाने कार्यरत आहेत.

प्रभाग 1 मधील मतदान केंद्र किनवट : क्रमांक 1/1 जि.प.कें.प्रा.शाळा नयाकॅम्प किनवट व 1/2 जवाहरूल उलूम उर्दू हायस्कूल किनवट येथील मतदान पथकाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी स्वागत करून साहित्यासह रवाना केले.


       

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News