किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत शांततेत मतदान : अध्यक्ष 8 व सदस्य पदासाठी 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद ; एकूण 74. 27 % झाले मतदान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 2, 2025

किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत शांततेत मतदान : अध्यक्ष 8 व सदस्य पदासाठी 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद ; एकूण 74. 27 % झाले मतदान

 



किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मंगळवारी (ता. 2) 29 मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून अध्यक्षपदासाठी 8 व सदस्यपदांसाठीच्या 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदवले आहे.

      पुरुष 12334 , स्त्री 13256 व  ईतर 03 असे एकूण  25593 मतदार नगर परिषदेच्या 10 प्रभागात आहेत. सकाळी 6.30 वाजता अभिरूप मतदान ( मॉकपोलच्या) व 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाच्या  वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात दोष आढळल्याने तिथे राखीव मतदान यंत्र वापरले . सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान 5.61 % , सकाळी 7.30 ते 11.30 दरम्यान 15.51% ,सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 दरम्यान 29.18 % , सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 दरम्यान 46.21 % . तीन मतदान केंद्रावर 5.30 वाजता नंतर बहुसंख्य मतदार रांगेत असल्यामुळे अंतिम आकडेवारीस विलंबच लागणार आहे. सकाळी धिम्या गतीने मतदानास प्रारंभ झाला. दुपारनंतर मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र बहुतांशी मतदान केंद्रावर दिसले. 

*किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025* ता.02/12/2025 : सकाळी 7.30 ते सायं. 5. 30 वाजेपर्यंत झालेलले मतदान : पुरुष : 9438 , स्त्री : 9568 ,इतर : 2 , एकूण मतदान : 19008 बकूण टक्केवारी : 74 . 27 %



    तहसिलदार तथा  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी आदिंसह सर्व अधिकारी-कर्मचारी , मास्टर ट्रेनर्स यांनी सकाळी 5.30 वाजतापासूनच परिश्रम घेतल्याने ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली.

     उप विभागिय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान जनजागृती (स्वीप कक्षाच्या) वतीने केलेल्या आवाहनानुसार तृतीय पंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी नांदेडवरून येऊन जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नयाकॅम्प किनवट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.


*तृतीय पंथी यांनी बजावला मतदानाचा हक्क*


किनवट , मंगळवारी ( ता.2) : येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नयाकॅम्प किनवट मतदान केंद्रावर तृतीय पंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला . यावेळी तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , मुख्याधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे , गट शिक्षणाधिकारी तथा मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाचे नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी उत्तम कानिंदे ,मास्टर ट्रेनर तथा स्वीप सदस्य एम.बी. स्वामी , रमेश मुनेश्वर , योगेश वैद्य , रूपेश मुनेश्वर , सारंग घुले आणि रांगेतील मतदार 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News