किनवट :
संभाजी ब्रिगेड तालुका शाखेच्या वतीने दिनांक 14 /1/ 2020 रोजी दुपारी एक वाजता किनवट पोलीस स्टेशन येथे 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या विवादास्पद पुस्तकाबद्दल तक्रार दाखल करण्यात आली . सदर तक्रारीमध्ये " आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपणास विनंती अर्ज करतो कि जय भगवान गोयल यांनी भाजपा कार्यालय दिल्ली येथे दिनांक 11/ 1/ 2020 रोजी प्रकाशित केलेल्या "आ के शिवाजी नरेंद्र मोदी" पुस्तकाच्या छापलेल्या कव्हर फोटोच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे असे आमच्या निदर्शनास आले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड विश्वाचे व तमाम बहुजन बांधवाचे दैवत आहेत म्हणून त्यांची तुलना एका कोणत्याही नेत्याशी किंवा व्यक्तीशी करणे हा महाराजांचा थोर अपमान आहे अशा कर्त्यामुळे तमाम शिवभक्त नाराज झाले असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे जयभगवान गोयल आणि सदर पुस्तक प्रकाशनावर आयपीसी कलम 295 A अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी" अशी तक्रार किनवट पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे तक्रारदाने लोखकास संपर्क साधला असता आ के शिवाजी ऐवजी" आज के शिवाजी नरेंद्र मोदी "असे वाचण्यात यावे असे सांगण्यात आले. तक्रारीवर बालाजी पाटील शिरसाट ( संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नांदेड) सचिन पाटील कदम (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष किनवट) आकाश इंगोले (संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष किनवट. सुमीत माने पाटील यांच्या सह्या आहेत सदर तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होतो का सदर तक्रार गुलदस्त्यात बंद होईल याकडे सर्व स्थानिक किनवट तालुकावाशी तसेच महाराष्ट्र व देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment