किनवट : बौद्ध धम्माने दैववाद, अंधश्रद्धा, विषमता, जातीभेद, कर्मकांड यांचा धिक्कार करून माणसाच्या कल्याणकारी अशा विज्ञानवादी तत्वज्ञानावर आधारित आचार संहिता दिली. हे बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्ये आहे. बुद्धाने जगाला अहिंसा, प्रेम, शांती व सम्यक दृष्टी दिली असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य प्रवचनकार अभि. एम.एम.भरणे (परभणी) यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने शुक्रवारी (ता.२९ ऑगष्ट २०२५ ) सम्राट अशोक बुद्ध विहार , राजर्षी शाहूनगर , गोकुंदा येथे वर्षावास प्रवचन मालीका अंतर्गत बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्ये या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन देतांना ते बोलत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रतिमा पुजनानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका महिला पदाधिकारी नंदा नगारे यांनी बुद्धवंदना घेतली. या शाखेच्या वतीने बौद्धाचार्य भरणे यांचे पुष्पगुच्छ देऊन संस्कार सचिव बंडु भाटशंकर यांनी स्वागत केले. वार्डशाखेचे सरचिटणीस विनय वैरागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी केले तर वार्ड शाखेचे अध्यक्ष रुपेश मुनेश्वर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले .
यावेळी प्रमोद भवरे, विश्वनाथ घुले, सिद्धांत खोब्रागडे, सुरेश पाटील, नंदा नगारे, गंगासागर वैरागडे, शकुंतला घुले, सुनिता पाटील , भालेराव ताई, भवरे ताई, कावळेताई, सांची कानिंदे, स्पर्शिका पाटील इत्यादी उपासक उपासिका व बालक बालिका उपस्थित होते. शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment