ज्यांच्या शिकवणी मुळे ,संस्कारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील थोर विद्वान आणि लढवय्ये नेते होऊ शकले.
अश्या या महान पित्याला रामजी बांबांना आज त्यांच्या स्मृति दिनी प्रेम हनवते यांनी वाहिलेली भावपूर्ण शब्दांजली.
-संपादक
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी आंबेडकर यांचा स्मृति दिन आहे.आजच्या दिनी 1913मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.ब्रिटिश सैन्यात ते बॉम्बे सॉप्पर्स मध्ये सुभेदार होते.नॉर्मल स्कुल ची परीक्षा उतिर्ण झाल्यावर महू (आता आंबेडकर नगर )येथे सैन्यासाठी असलेल्या शाळेत शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.बढती मिळून त्याच शाळेचे हेडमास्तर झाले महू येथे छावणीत बाबासाहेब यांचा 14/4/1891रोजी जन्म झाला.
लॉर्ड किचनेर यांनी सैन्याची पुनर्रचना करण्याचे धोरण ठरविले.ब्रिटिश सैन्यातील मोठ्या आधिकारांच्या पदांवर अनेक अस्पृश्य अधिकारी होते.त्यांना मिळणारा मानसन्मान पाहून त्यांच्या हाताखाली कामकाज करणारे एतदेशिय उच्चवर्णिय सैनिक त्यांचा द्वेष करू लागली ,कधी कधी आज्ञाभंग करू लागली. अस्पृश्य अधिकार्यांना सलुट salute करणार नाही असे त्यांनी सरकारला कळविले.सैन्यातील हा वर्णद्वेषाचा असंतोष पुन्हा 1857 च्या बंडास कारण ठरू नये यासाठी अस्पृश्य लोकांची सैन्य भरती बंद करण्यात आली.जे सैन्यात कार्यरत होते त्यांना पेन्शन देऊन कामावरून कमी करून घरी पाठविले. अस्पृश्यांच्या आतपर्यंतच्या लष्करी पराक्रमाचा आणि सेवेचा जराही विचार न करता गरज सरो वैद्य मरो या नीतीने अत्यंत कृतघ्नपणे ब्रिटिशांनी हे कृत्य केले यामुळे हजारो अस्पृश्य सैनिक देशोधडीला लागले सैन्यातून कमी झाल्यामुळे रामजी बाबा दापोली गावी राहायला आले.या ठिकाणी निवृत्त सैनिकांसाठी सरकारने जागा उपलब्ध करून दिली होती.तेथे महार.मांग चम्भार अश्या अनेक सैनिकांची कुटुम्बे राहायला होती. आजही आहेत.
डिसेम्बर 2016च्या शेवटी मी दापोली ला गेलो.काळकाई कोंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कॅम्प ला भेट दिली.रामजी आंबेडकर यांचे घर आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण व्यतित झाले त्या ठिकाणी मी माथा टेकऊन आलो.रमाबाई च्या नात्यातील वनंद गावचा योगेश धोतरे या मित्राने मला माझ्या पूर्ण आठवड्यातील अभ्यास दौऱ्यात सोबत केली.(याच ठिकाणी पूर्वी रामजी बाबांचे घर होते.ते पडझड झाल्या वर बौद्ध जन पंचायती ने तेथे खालील फोटोत दिसणारे स्मृति स्थल उभारले.
ती जागा ऐलिनार झेलियत या विदुषी ने शोधून काढली.एका मुस्लिम बांधवाच्य ती ताब्यात होती.ती सोडऊन तेथे हे स्मारक तयार केले अशी माहिती मला डॉ.आनंद नरंगलकर सर (दापोली कृषि विद्यापीठात कीटकशास्त्र विभाग प्रमुख )यांनी दिली.
रामजी आंबेडकर हे जगातील उत्कृष्ठ शिक्षक होते.त्यांच्या शिकवणी मुळे ,संस्कारामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील थोर विद्वान आणि लढवय्ये नेते होऊ शकले.
अश्या या महान पित्याला आज त्यांच्या स्मृति दिनी भावपूर्व अभिवादन.
प्रेम हनवते
8888857402





No comments:
Post a Comment