किनवट :
तालुक्यातील उमरी (बाजार ) येथील रहिवासी लक्ष्मण रामजी केराम ( वय 49 वर्षे ) यांचे सोमवारी ( ता. तीन ) पहाटे आदिलाबाद येथील रूग्णालयात उपचार घेतांना निधन झाले. त्यांचे पाश्चात्य पत्नी, तीन मुली असा परिवार असून सोमवारी ( ता. तीन ) दुपारी चार वाजता ' राजगृह ', शहीद गोंडराजे मैदानाजवळ, किनवट येथून त्यांची प्रेतयात्रा निघणार असून किनवट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांचे ते बंधू होत.




No comments:
Post a Comment