नांदेड :
किनवट येथून ' दलित पँथर ' चळवळीतून आपल्या सामाजिक कार्याची कारकिर्द सुरू करणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शनिवारी ( ता. 8 ) नांदेडात प्रजासत्ताक पार्टीची स्थापना केल्याची घोषणा केली.
आपल्या कणखर बाण्यांनी आंबेडकरी विचारपेरत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेले नामांतर लढ्यातील नेते तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी शनिवारी (ता. 8 ) शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आपल्या जिवाभावाच्या खंबीर कार्यकर्त्यांना एकत्र करून बैठक घेतली. सर्वांशी विचारविनीमय करून आजच्या विषाक्त परिस्थितीत नव्या जोमानं महाराष्ट्रभर क्रियाशील कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी प्रजासत्ताक पार्टीची स्थापना करीत असल्याची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ नेते पी.एस. गवळे, प्रा. देविदास मनोहरे , जनार्दन कवडे, बी.बी.पवार, बबिताताई पोटफोडे आदींची उपस्थिती होती.
" नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचे हित कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी समाज कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली एक होऊ शकला नाही. परिणामी आंबेडकरी मतदार व जनता आजही सत्तेपासून वंचित आहे. नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बाल्ले किल्ला आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जनतेला, कार्यकर्त्यांना एकत्र करून एका झेंड्याखाली आणण्यासाठी प्रजासत्ताक पार्टीची आपण स्थापना करीत आहोत. "
-सुरेशदादा गायकवाड
No comments:
Post a Comment