मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे व शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिल्या प्रज्ञाशोध परीक्षां केंद्रांनां भेटी
नांदेड :
सन् 2019 -20 या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध सराव परीक्षा आज सर्व शाळा स्तरावर घेण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या 2200 शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवी च्या 20426 विद्यार्थ्यांपैकी 18304 विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. इयत्ता पाचवीच्या प्रविष्ट 16317 विद्यार्थ्यांपैकी 14697 विद्यार्थी, इयत्ता आठवीच्या प्रविष्ट 4056 विद्यार्थ्यांपैकी 3617 म्हणजे 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व परीक्षा केंद्रावर व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते.शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी शाळास्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
आज मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मुदखेड तालुक्यातील कन्या बारड, जिल्हा परिषद प्रशाला माळकौठा, चिकाळा, भोकर तालुक्यातील भोसी या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहिला. त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे हे होते.

No comments:
Post a Comment