अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन


नांदेड : शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मे 2020 व त्यापुढे होणाऱ्या सर्व अखिल भारतीय परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षा आस्थापनेने घ्यावे, असे सुचित केले आहे.

देशात कोविड 19 मुळे 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा झाली नसल्याने ती पुढे होणार आहे. सर्व आस्थापना मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड अंतर्गत आस्थापनावरील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा एकत्रित होणार असल्याने आपल्या आस्थापनेतील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज हे www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. त्या अर्जाची प्रिंट व परीक्षा शुल्क प्रस्तूत आस्थापनेत जमा करण्यात यावे, असे एम. बी. कुलकर्णी, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी कळविले आहे.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News