ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाख रुपयांची मदत सातारा जिल्ह्यासाठी 11 लाखाचे पीपीई कीट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाख रुपयांची मदत सातारा जिल्ह्यासाठी 11 लाखाचे पीपीई कीट



मुंबई : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी, लि.मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. 

सहकार मंत्री श्री.पाटील यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड - 19 या नावाने आर्थिक मदत करण्याबाबत सहकारी संस्थांना यापुर्वी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत  ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी, लि.मुंबई यांनी ही मदत केली आहे. तसेच, 11 लाखाचे स्पेशल प्रोटक्शन कीट सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देऊन जिल्हाधिका-याकडे सुपूर्द केले आणि मोठ्या गावांना थर्मामिटर देण्यात आले आहेत. 

श्री. पाटील म्हणाले, राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची व्याप्ती विचारात घेता अशा नैसर्गिक आपत्ती प्रसंगी या सहकारी संस्थांने सामाजिक बांधीलकीच्या भुमीकेतुन मदत केली आहे ही कौतुकास्पद बाब आहे. त्याबद्दल सोसायटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि सामाजिक बांधीलकीच्या भुमीकेतुन राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी असे आवाहन  केले. 
  
यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत ढमाळ, संचालक जिजाबा पवार, मुख्य व्यवस्थापक रामदास लिलीगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News