करबला भागात नवीन एक कोरोना रुग्ण आतापर्यंत 2 हजार 441 अहवाल निगेटिव्ह ; एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

करबला भागात नवीन एक कोरोना रुग्ण आतापर्यंत 2 हजार 441 अहवाल निगेटिव्ह ; एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू



नांदेड  : शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
               आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 22 हजार 57 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 730 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 441 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू आहे. या घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 98 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
              आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
                जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 19/05/2020 वेळ 05.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित - 2720
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2487
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1072
अजून निरीक्षणाखाली असलेले - 198
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -57
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2430
एकुण नमुने तपासणी- 2730
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 98
पैकी निगेटीव्ह - 2322
नमुने तपासणी अहवाल बाकी- 188
नाकारण्यात आलेले नमुने - 14
अनिर्णित अहवाल – 105
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 122057 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News