नांदेड : आज रविवारी ( दिनांक १७/०५/२०२० रोजी ) दुपारी १२.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या माहितीनुसार आज १३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एकूण पॉझिटिव्ह संख्या ९७ झाली आहे.
दिनांक १४/०५/२०२० ते दिनांक १६/०५/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या ३७४ स्वॅब पकी सर्व ३७४ रुग्णांचा अहवाल प्राप्त झालेला आहे . त्यामध्ये एकूण १३ रुग्ण हे पाँझीटीव्ह आढळून आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझीटीव्ह रुग्ण संख्या ९७ झाली आहे . आज एकूण १३ पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ९ , रुग्ण प्रवासी आहेत . १ रुग्ण करबला भागातील असून २ रुग्ण हे अवचलनगर भागातील व ग्रामीण रुग्णालय , बारड येथील १ रुग्ण आहे . सदरील रुग्णांपैकी १२ पुरुप ( अनुक्रमे वय वर्षे १३ , १४ , १४ , १९ , २४ , २५ , ३० , ३७ , ४४ , ५० , ५० , ७४ ) तसेच ? स्त्री ( वय वर्षे ५७ ) आहेत . सदरील रुग्ण हे यात्री निवास व एनआरआय भवन व ग्रामीण रुग्णालय बारड येथे औषध उपचार घेत आहेत . सद्यःस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे . त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे . एकूण ९७ रुग्णांपैकी २६ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे . ६४ रुग्णां पैकी ८ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ५४ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर मध्ये २ रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु आहे . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण ५ रुग्णाचा मृत्यु आला असून मृत्यु पावलेले रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची अवाहान करण्यात येत आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.




No comments:
Post a Comment